Prashant Damle: प्रशांत दामले खड्ड्यांमुळे त्रस्त, 'स्वादिष्ट जेवण जेवलो पण...' पोस्ट चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार मंडळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही कलाकार आपल्या बेधडक वक्तव्यांनी तर काही पोस्टमुळे बरेच चर्चेत असतात.
Prashant Damle
Prashant Damle Saam Tv

Prashant Damle: मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार मंडळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही कलाकार आपल्या बेधडक वक्तव्यांनी तर काही पोस्टमुळे बरेच चर्चेत असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रशांत दामले. प्रशांत दामले मराठी चित्रपटसृ्ष्टीत नाटकांमुळेच बरेच नावाजलेले आहेत. त्यांचे सर्वाधिक गाजलेले नाटक म्हणजे, 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. या नाटकाने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

Prashant Damle
Rajinikanth Birthday : बापरे! चक्क रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते पैसे, पुढे जे झालं ते...

सध्या ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र दौऱ्यावर असून नाटकाचे महाराष्ट्रात बरेच प्रयोग झाले आहेत. औरंगाबाद ते वैजापूर रस्त्याच्या खड्ड्यांबाबत आता प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून वाभाडे काढले. अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेल्या रस्त्यांमुळे नागरिक, वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यात आता प्रशांत दामले यांनी रस्त्यावरुन राजकारणी आणि प्रशासनाचे कान उपटले आहेत.

Prashant Damle
Besharam Rang: दीपिका-शाहरुखने दाखवले 'बेशरम रंग', पठाण चित्रपटातील गाण्यात दिसला कलाकारांचा बोल्ड अवतार

'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या प्रयोगासाठी दामले दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत येऊन गेले. हा प्रयोग झाल्यावर ते औरंगाबादहून शिऊर बंगलामार्गे नाशिककडे निघाले होते, त्यावेळी खड्ड्यांमुळे त्रस्त झाल्यानं त्यांनी सर्वसामान्यांची वेदना सोशल मीडियावर मांडली आहे. या खड्ड्यातील रस्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत औरंगाबादमध्ये स्वादिष्ट जेवण केले, पण खड्डेमय रस्त्यामुळे जेवण आपोआप पचलं अशा शब्दांत दामले यांनी वाभाडे काढले. यांच्या या पोस्टने सध्या सोशल मीडियावर बराच गदारोळ निर्माण झाला आहे.

Prashant Damle
Bigg Boss Marathi 4: स्नेहलता वसईकर बिग बॉसच्या घरातून बाहेर, घरात आणखी काय नवे बदल होणार याची साऱ्यांनाच चिंता

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणतात, "आज संभाजीनगरचे दोन्हीही प्रयोग खणखणीत झाले आहे. रसिकांना धन्यवाद. अतिशय स्वादिष्ट पण थंड जेवण आनंदाने जेवलो. (कॅन्टीन बंदच आहे म्हणून) मग निघालो. औरंगाबाद वैजापूर रस्ता असा आहे. त्यामुळे जेवन आपोआप पचले. आता उद्या संध्याकाळी ५:३० वाजता कालिदास नाट्यगृह नाशिक भेटूच."

आता प्रशांत दामलेंच्या पोस्टनंतर आता तरी सरकारला जाग येणार का? सामान्य नागरिकांना होणारा त्रास एका सामान्य मांडल्यामुळे आता तरी प्रश्न सुटेल का? असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडले आहेत. कधी पर्यंत याचे उत्तर सामान्य नागरिकांना मिळेल पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com