Ritesh Deshmukh: रितेश देशमुखला का मागावी लागली पत्रकारांची माफी? नेमकं काय आहे प्रकरण?

नुकतेच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेश देशमुखच्या मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापूरात पत्रकारांसोबत गैरवागणुक झाल्याचं समोर आलं आहे.
Riteish Deshmukh-Genelia D'Souza
Riteish Deshmukh-Genelia D'SouzaSaam TV

Ritesh Deshmukh: सध्या बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख सध्या ' वेड' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहेत. सध्या ते अनेक वेगवेगळ्या माध्यमातून प्रमोशन करण्यासाठी महाराष्ट्रात दौरे करत आहे. त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलरसह गाण्यांनीही प्रेक्षकांना अक्षशः वेड लावले आहे.

अशातच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेश देशमुखच्या मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापूरात पत्रकारांसोबत गैरवागणुक झाल्याचं समोर आलं आहे. घडलेल्या गैरप्रकारावर रितेशने मीडियासमोर माफी मागितली आहे. रितेश देशमुख यांच्या मीडिया ऑर्गनायझर कंपनीकडून कोल्हापुरात पत्रकारांना व्यवस्थित वागणूक न दिल्याचा ठपका लावण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रितेश - जेनेलिया चित्रपटाच्या प्रमोशनमुळे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवादही साधला. त्यावेळी काही पत्रकारांनी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

एक पत्रकार नाराजी व्यक्त करत म्हणतो, 'आम्हाला निमंत्रण नव्हतं हे मान्य आहे. पण आम्हाला कल्पना नव्हती की निवडक लोक आहेत की सगळ्यांना बोलू दिलं जाणार, पण आमच्या पाठी बाऊन्सर लावून हॉटेलमधून हाकललं. आमचा अवमान झालाय. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं होतं.'

या प्रकरणाबाबत मी अनभिज्ञ असल्याचे रितेशने पत्रकारांना सांगितले आणि त्याने त्यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांची माफी मागितली. ''तुमचा अवमान झाला. मला माफ करा. तुमच्यासोबत नक्की काय घडलं हे मला माहिती नाही. मी इथे आलो पण मला कोणाला भेटायचं आहे हेही माहिती नव्हतं. ते माझ्या हातातही नाही. तुमचा माझ्याकडून अवमान झाला असेल तर मी माफी मागतो. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत." असे रितेश देशमुख म्हणाला.

'माझ्या लग्नाला तब्बल ११ वर्षे झाली, पण कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला आम्हाला कधीच एकत्र येता आले नाही. काही लोकांची समोरासमोर भेट झाली नाही, त्यांची मी माफी मागतो. तुम्हा सर्वांवर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा हीच इच्छा,' असेही रितेशने म्हंटले आहे.

रितेश जेनेलियाचा संपुर्ण महाराष्ट्रात 30 डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com