Santosh Juvekar Post: संतोष जुवेकरचा अजूनही स्ट्रगलर साला? चाळीतील दुकानात करतोय हेअर कट

Marathi Actor: अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी भन्नाट पोस्ट करत असतो.
Santosh Juvekar Post
Santosh Juvekar PostSaam TV

Santosh Juvekar Share Memories:

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी भन्नाट पोस्ट करत असतो. दहीहंडीनिमित्ताने त्याचं नवीन गाणं प्रदर्शित झालं होत. 'स्ट्रगलर साला' या वेबसीरीजच्या माध्यमातून देखील संतोष जुवेकर आपल्या भेटीला येत असतो.

संतोष जुवेकरने त्याच्या ब्रँडेड गोष्टीच्या आवडीविषयी सांगितले आहे. ब्रँडेड गोष्टी वापरण्याचा त्याचा अनुभव संतोषने शेअर केला आहे.

Santosh Juvekar Post
Bollywood Actress In Trouble: सलमान खानच्या हिरोईन विरोधात अटक वाॅरंट; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...

संतोष जुवेकरने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एका सलूनमध्ये गेल्याचे दिसत आहे. संतोषने 'सर जो तेरा चाकराये' या गाण्यासह हा फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला नेहमीच ब्रँडेड गोष्टी लागतात. मी असा उगाच कुठेही कुठल्याही जागी जात नाही. जेव्हा मला माझा मी हवा असतो.

ते फस फस करून उडवलेल पाणी, फळीवरच्या लॉरीयलच्या बाटलीतलं खोबरेल तेल जेव्हा पच पच करून माझ्या डोक्यावर तो थापतो आणि खसा खसा घासतो आणि विचारतो प्रेमाने " बरं वाटतंय का रे? " तेव्हा अगदी घरी असल्या सारखं वाटतं, आईची आठवण येते. मला हा माझा ब्रँड कायम सोबत हवाय. बस इतनासा ख्वाब है!!!! (Latest Entertainment News)

संतोष जुवेकरच्या या पोस्टने तो किती साधेपणाने त्याच आयुष्य गाजतो हे तुमच्या लक्षात आलं आलं असेल. संतोषच्या या साधेपणाचा सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

संतोष जुवेकरच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, 'संतोष सरांचा साधेपणा कायमच आमचे मन जिंकून जातो, मातीशी जोडलेला एकमेव अभिनेता असं म्हणायला हरकत नाही.' तर आणखी एकाने कमेंट केली आहे, 'साधेपणाला तोड नाही.' अशा अनेक कमेंट संतोषच्या पोस्टवर आल्या आहेत. (Celebrity)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com