Subodh Bhave Celebration: याला म्हणतात जरा हटके! बाप्पासाठी सुबोध भावेने 'चांद्रयान ३' उभारले; पाहा फोटो

Ganesh Chaturthi: अभिनेता सुबोध भावेच्या घराचं डेकोरेशन खुप भारी आहे.
Subodh Bhave Lord Ganesha Decoration
Subodh Bhave Lord Ganesha DecorationInstagram @subodhbhave

Subodh Bhave Share Photo:

देशभरात गणेश चतुर्थीची धूम आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले. सर्वांसाठी त्यांचा बाप्पा खास असतो. आपल्या बाप्पाची सजावट भारी कशी होईल यासाठी सगळे प्रयत्न करत असतात.

या सजावटीत कलाकार मंडळी देखील मागे नाहीत. आपल्या बाप्पासाठी स्पेशल काहीतरी करत असतात. अभिनेता सुबोध भावेच्या घराचं डेकोरेशन तसंच भारी आहे.

Subodh Bhave Lord Ganesha Decoration
Kangana Ranaut Post: 'ही नव्या युगाची सुरुवात... ' महिला आरक्षणावर कंगना रनौतने व्यक्त केला आनंद

सुबोध भावेने नुकतेच त्याच्या घराच्या गणपतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुबोधच्या घराच्या गणपतीला चांद्रयान ३चं डेकोरेशन करण्यात आला आहे. चांद्रयान ३, चंद्र, चंद्रावर उतरलेलं प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर या देखाव्यात दाखविण्यात आले आहेत. तर चंद्रावर येथे हे यान उतरले त्या 'शिव शास्त्री' असे नाव देण्याच आलं ते देखील देखाव्यात दाखविण्यात आले आहे.

सुबोध भावेने हे फोटा पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'गणपती बाप्पा मोरया! यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा "चांद्रयान 3" श्री गणेश आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना, मोरया.' (Latest Entertainment News)

सुबोध भावेच्या मुलांनी साकारलेला हा देखावा अप्रतिम आहे. 'चांद्रयान ३'फार सुंदर पद्धतीने त्यांनी साकारले आहे. सुबोधच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करून कौतुक करत आहेत. (celebrity)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com