Swapnil Joshi Video: '...असं स्वागत व्हायला भाग्य लागतं', मायदेशी येताच मुलांनी केलेलं स्वागत पाहून भावुक झाला स्वप्निल जोशी, VIDEO केला शेअर

Swapnil Joshi Insta Post: अभिनेत्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलांनी केलेल्या स्वागताचा व्हिडिओ पोस्ट केलाय.
Swapnil Joshi
Swapnil Joshi Saam tv

Swapnil Joshi Mumbai Airport Video:

मराठी चित्रपटसृष्टीचा (Marathi Film Industry) 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता स्वप्निल जोशी (Actor Swapnil Joshi) नुकताच आपले शूटिंग पूर्ण करून मायदेशी परतला. मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) दाखल होताच स्वप्निलच्या मुलांनी त्याचे खास स्वागत केले. हे पाहून स्वप्निल जोशी भारावून गेला. अभिनेत्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलांनी केलेल्या स्वागताचा व्हिडिओ पोस्ट केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Swapnil Joshi
Spruha Joshi Video: 'पापा केहेते है बडा नाम करेगी...', खेकडा खायला शिकवणाऱ्या स्पृहा जोशीची नेटकऱ्यांनी घेतली शाळा

स्वप्निल जोशीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, परदेशातून तो मुंबई एअरपोर्टवर दाखल होतो. वडिलांचे स्वागत करण्यासाठी स्वप्निलची दोन्ही मुलं मायरा आणि राघव एअरपोर्टवर आलेले असतात. जसा स्वप्निल एअरपोर्टच्या बाहेर येतो. तशी त्याची दोन्ही मुलं त्याच्या दिशेने धावत येतात आणि त्याला घट्ट मिठी मारतात.

Swapnil Joshi
Welcome 3 Teaser: अक्षय कुमारने स्वतःसह चाहत्यांना दिले खास गिफ्ट; 'वेलकम 3'चा टीझर केला शेअर

स्वप्निलच्या दोन्ही मुलांनी आपल्या बाबासाठी खास ग्रिटींग तयार करुन आणलेले दिसत आहे. स्वप्निल जोशीला गोड मिठी मारून ते हे ग्रिटींग त्याला देतात. या ग्रिटिंगमध्ये वेलकम टू मुंबई असे लिहिले आहे. मुलांनी स्वत:च्या चिमुकल्या हातांनी आपल्या लाडक्या बाबासाठी हे ग्रिटिंग तयार केलेले दिसत आहे. बाबा आल्याचे पाहून दोन्ही मुलं आनंदाच्या भरामध्ये उड्या मारून मारून नाचताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून स्वप्निल भारावून जातो.

Swapnil Joshi
Gadar- 2 Movie Box Office Collection: 'गदर- 2' ने मोडला 'बाहुबली- 2' चा रेकॉर्ड, सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी चित्रपट

स्वप्निल जोशीने हा व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'Been there done that…there is no place like “being loved” !!! मायदेशी परत आल्यावर असं स्वागत व्हायला भाग्य लागतं' स्वप्निल जोशीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला लाईक करत कमेंट्स केल्या आहेत.

Swapnil Joshi
Gashmeer Mahajani Post: 'केस कापले असते तर...', वडिलांच्या निधनानंतर टक्कल न केल्याबद्दल विचारणाऱ्या नेटकऱ्याला गश्मीरने चांगलंच झापलं

स्वप्नील जोशी त्याचा आगामी चित्रपट 'इंद्रधनुष्य' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशीसोबत सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव हे करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com