Upendra Limaye New Film: जबरी बोलणं अन् खतरनाक अभिनय... उपेंद्र लिमये साकारणार ‘नवी’ भूमिका

'फेमस होणारच' या आगामी ऍक्शन पटातून अभिनेते उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Upendra Limaye Film
Upendra Limaye FilmSaam Tv

Upendra Limaye Film: नवकलाकारांची चलती असतानाही अनुभवी आणि दिग्गज कलाकारांचं चित्रपटात असणं नेहमीच लक्षणीय असत. रांगड्या व्यक्तिमत्वाने आणि जबरदस्त अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेता उपेंद्र लिमयेबद्दल ही बोलावं तितकं कमीच. ऍक्शन पट म्हटलं की उपेंद्र यांचा आतापर्यंतचा अभिनय आणि त्यांचं जबरी बोलणं आठवत. हे सर्व पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी अभिनेते उपेंद्र लिमये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 'फेमस होणारच' या आगामी ऍक्शन पटातून अभिनेते उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Upendra Limaye Film
Abdu Rozik In Gun Controversy: बिग बॉस फेम अब्दू अडचणीत; पोलिसांत तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

'फेमस होणारच' या चित्रपटात उपेंद्र लिमये या दिग्गज कलाकारासह अभिनेता महेश गायकवाड, अक्षया हिंदळकर, पूजा राजपूत, तेजस्विनी सुनील, प्रदीप शिंदे, प्रेम धर्माधिकारी, विजय निकम, अक्षय अशोक म्हस्के या कलाकारांना पाहणं ही रंजक ठरणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. ऍक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाची जबाबदारी नवोदित दिग्दर्शक अक्षय गवसाने याने उत्तमरीत्या पेलवली आहे.

Upendra Limaye Film
The Kapil Sharma Show: कृष्णा अभिषेकने मामा गोविंदाला मारले टोमणे; दोघांमध्ये नेमकं कशावरून बिनसलं? वाचा सविस्तर

गवसाने प्रॉडक्शन हाऊस' आणि 'गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस' प्रस्तुत तसेच 'ए. जी प्रॉडक्शन हाऊस' यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्दर्शक अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित 'फेमस' हा नवाकोरा ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. लवकरच 'फेमस होणारच' हा ऍक्शन पट मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com