
Amruta Khanvilkar New Movie Kalavati: मराठी चित्रपटासह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा आणि उत्कृष्ट नृत्यशैलीने प्रेक्षकांना घायाळ करणारी अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. गेल्या वर्षी अमृातने अवघ्या महाराष्ट्राला चंद्रा गाण्याच्या माध्यमातून आपल्या तालावर नाचवले होते. सोबतच या वर्षात ही अमृता अनेक उत्कृष्ट आणि दमदार कलाकृतीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नुकताच अमृताने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 'कलावती' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रेक्षकांना शूटिंग सुरु झाल्याची माहिती दिली आहे.
नव्या वर्षात अमृताने गेल्या काही दिवसांपुर्वीच आणखी एका चित्रपटाची घोषणा केली होती. ललिता शिवाजी बाबर या चित्रपटात अमृता ललिता बाबरची भूमिका साकारणार आहे. ललिता बाबरची ओळख प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणून सर्वश्रुत आहे. या चित्रपटाचे टीझर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.
अमृताने 'कलावती' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या सिनेमाबद्दल अधिक माहिती समोर आली नसली तरी पोस्टरवरून 'कलावती' ची कथा आणि अमृताची भूमिका चंद्रमुखी सारखीच असेल असा अंदाज आहे. अमृताने नव्या सिनेमाची घोषणा करताच तिच्यावर चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता तिला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
अनेकांना वाटतंय हा चित्रपट चंद्रमुखीचा पुढचा पार्ट आहे. पण असं नाही. चंद्रमुखी आणि कलावतीचा काहीही संबंध नाही. संजय जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून संजय जाधव हॉरर कॉमेडी प्रकार हाताळणार आहेत. रोमान्स सिनेमाचे बादशाह संजय जाधव कलावतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच हॉरर कॉमेडीपट हाताळणार आहेत.
संजय जाधव दिग्दर्शित 'कलावती' चित्रपटाची निर्मिती प्रजय कामत यांनी केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्वनी लोणारी, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, संजय सेजवाल, नील सालेकर हे कलाकार दिसणार आहेत. अद्याप चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.