
Amruta Khanvilkar Bye Bye Instagram: अवघ्या महाराष्ट्राला दमदार अभिनयशैलीनं घायाळ करणाऱ्या अमृताची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या वर्षी चंद्रमुखी चित्रपटांमुळे अमृता बरीच प्रकाशझोतात आली आहे. नेहमीच आपल्या दिलखेचक अदांमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच अमृताने सोशल मीडियावरुन एक सर्वात मोठी घोषणा केली आहे. तिच्या त्या घोषणेमुळे सर्वत्रच चर्चा होत आहे. अमृताने सोशल मीडियाला रामराम ठोकल्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय.
अमृताने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केलीय. "मी तुला पुन्हा भेटेन जेव्हा योग्य वेळी आपले मार्ग कधीतरी पुन्हा एकमेकांसमोर येतील" अशी पोस्ट अमृताने लिहिली आहे. याशिवाय Taking Break, पुन्हा भेटू असं जाहीर करत अमृताने सोशल मीडियाला रामराम ठोकल्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय.
अमृातने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून तिच्या भावी आयुष्यासाठी ही तिला शुभेच्छा दिल्या, तिचे चाहते म्हणतात, नेमकं काय झालं कळेल का ?, तर आणखी एक चाहता म्हणतो, माणसाला जेव्हा ब्रेक घ्यायचा आहे, तेव्हा त्याने तो आवश्य घ्यावा, तर आणखी एक म्हणतो, बापरे काय झालं मॅडम, नक्कीच आशा आहे, तुम्ही एका ब्रेकनंतर चाहत्यांच्या भेटीला याल. तुमची वाट पाहोतय आम्ही... असं म्हणत अमृताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
अमृता या वर्षी काही चित्रपटांमुळे बरीच चर्चेत आली आहे. या वर्षी ती 'ललिता शिवाजी बाबर' आणि 'कलावती' या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आली आहे. लवकरच दोन्हीही चित्रपटांची शूटिंगला सुरुवात होणार आहे. कलावती चित्रपाटाच्या मुहूर्तासाठी तिने गेल्या काही दिवसांपुर्वी हजेरी लावली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.