
Kshiti Jog New Bollywood Film: निर्माता करण जोहरने काल 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केले. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, रणवीर सिंग,धर्मेंद्र, जया बच्चन या मोठ्या चेहऱ्यासोबतच एक मराठी चेहरा देखील झळकत आहे. हा चेहरा म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग.
शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, रणवीर सिंग,धर्मेंद्र, जया बच्चन या मोठ्या चेहऱ्यासोबत मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग दिसणार आहे. या चित्रपटात क्षिती एका महत्वपूर्ण आणि रंजक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची क्यूट लव्हस्टोरी अनुभवता येणार आहे. 'मिट दि रंधवास' अशी ओळख करून देणाऱ्या या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चा होत आहे.
करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एकामध्ये आलिया भट्टचा लूक तर दुसऱ्यामध्ये रणवीर सिंग त्याच्या हटक्या स्टाईलमध्ये दिसत आहे. तर तिसऱ्या पोस्टरमध्ये दोघे एकत्र दिसत आहेत. या रॉकिंग पोस्टरवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पोस्टर लाँच करण्याचं मुख्य कारण म्हणजे, करण जोहरच्या वाढदिवस.
इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल क्षिती जोग म्हणते, “अनेक वर्षं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठच नाही तर आताच्या काळात सुपरहिट असलेला रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्यासोबत काम करतानाही धमाल आली. धर्मा प्रॉडक्शन, करण जोहर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अफलातून होता. करण सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत. समोरच्याकडून अपेक्षित सीन कसा करून घ्यायचा याचे कसब त्यांच्याकडे उत्तम आहे. एकंदरच ही प्रक्रिया खूप छान होती.”
'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपट येत्या २८ जुलै २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्य भूमिकेत रणवीर सिंग, आलिया भट्ट सोबत शबाना आझमी, धर्मेंद्र,जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील या चित्रपटात दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.