Mitali Mayekar Bold Photo: 'तुम्हाला लाज वाटेल... 'स्पेनमधील बोल्ड फोटो शेअर करत मिताली मयेकरने नेटकऱ्यांना भरली तंबी

Mitali Mayekar Post: मितालीने नुकतेच स्पेनच्या समुद्रकिनाऱ्यावरील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Mitali Mayekar Bold Photo
Mitali Mayekar Bold PhotoInstagram @mitalimayekar

Mitali Mayekar Photo from Spain: अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या स्पेनमध्ये त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं व्हेकेशनमधील सुंदर फोटो आणि व्हिडिओ दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मितालीने नुकतेच स्पेनच्या समुद्रकिनाऱ्यावरील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोपेक्षा तिच्या कॅप्शनची जास्त चर्चा आहे.

मिताली स्पेनमध्ये विविध नवनवीन गोष्टी ट्राय करत आहे. तिने या सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. मितालीने सी डायविंग, स्काय डायविंग अशा ऍडव्हेंचर्स गोष्टीही केल्या आहेत. (Latest Entertainment News)

Mitali Mayekar Bold Photo
Rahul-Disha Share Good News: राहुल वैद्य-दिशा परमारने शेअर केली गुड न्यूज; सोनोग्राफीचा व्हिडिओ देखील केला शेअर

स्पेनमध्ये मितालीने सुंदर आऊटफिटमध्ये देखील दिसत आहे. नुकत्याच शेअर एका पोस्टमध्ये मितालीने बिकिनी घातली आहे. फोटोसोबत तिचे मत स्पष्ट करणारे कॅप्शन देखील तिने लिहिले आहे. जेणेकरून तिला तिच्या कापड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांची तोंडं तिने आधीच बंद केली आहेत.

मितालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आज मी उठले आणि काहीतरी वादग्रस्त करायचं ठरवलं. ता.क.- कॉमेंट बॉक्समध्ये मला ‘आपली संस्कृती’ यावर ज्ञान देण्याचा प्रयत्नही करू नका, तुम्हाला लाज वाटेल.' बिकिनी घातल्याने तिला नेटकरी ट्रोल करणार हे ती जाणून होती म्हणूनच मितालीने कॅप्शनमधून मला शिकवू नका असं सूचित केलं.

मितालीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. ज्यावर विविध रंगाचे नक्षीकाम आहे. कामात स्टेटमेंट इअररिंग्ज आणि तिच्या हातात ब्रेसलेट आणि अंगठ्या देखील आहेत. तर मितालीने केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये मिताली सुंदर दिसत आहे.

मितालीच्या या पोस्टवर प्रार्थना बेहेरे, रोहित राहुल, अभिजित खांडकेकर, सानिया चौधरी, शिवानी बोरकर, तितीक्षा तावडे या सेलिब्रिटीनी कमेंट केल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी कमेंट करून मितालीला पाठिंबा दिला आहे.

'असे कपडे घालायला संस्कृती नाही तर फिगर लागते ... ज्यांच्याकडे अशी फिगर नसते ते ट्रोल करणार... त्यांनी छान मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं तेव्हा कोणी कमेंट केली नाही, छान संस्कृती जपली म्हणून... कीप इट अप मिताली' अशी कमेंट एका नेटकाऱ्याने केली आहे. तसेवेचं अशाच आशयाच्या अनेक कमेंट मितालीच्या या पोस्टवर दिसत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com