Neha Pendse: बाबो... नेहा पेंडसे एक नाही तर तब्बल सहा मुलांची आई; खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

नेहाने जानेवारी 2020 मध्ये व्यावसायिक शार्दुल बयासशी लग्न केलं. ती बिग बॉसच्या बाराव्या सिझनमध्येही झळकली होती. नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
Neha Pendse
Neha PendseInstagram

Neha Pendse: मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसेचा क्रमांक अग्रस्थानी आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे.

Neha Pendse
Kangana Ranaut: कंगनाचा नेमका टोला कोणाला?, ‘अतिक्रमण करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील’ म्हणत लावली घराबाहेर पाटी

‘पटलं तर घ्या’ या टॉकशोमध्ये नेहाने ही गोष्ट कबूलही केली आहे. आता नेहाची ही क्युट मुलं कोण आहेत आणि हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर तुम्हाला येत्या शुक्रवारी म्हणजेच १७ मार्च रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर मिळणार आहे. नेहाने शार्दूलसोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. आता अशा प्रवासाचे नेमके कारण काय, याचेही उत्तर तिने या टॉकशो मध्ये दिले आहे.

या टॉकशोमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मेननही हजेरी लावली आहे. यावेळी त्यानेही त्याच्या आयुष्यातील एक गुपित उघड केले. 'गल्ली बॉय' चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदीने साकारलेल्या एमसी शेर या भूमिकेसाठी सिद्धार्थला विचारणा करण्यात आली होती. आता ती भूमिका त्याच्या हातून का सटकली, यांचा खुलासा सिद्धार्थने केला आहे. असे त्याच्यासोबत अनेकदा घडल्याचेही त्याने सांगितले.

Neha Pendse
Sonali Kulkarni Video: भारतातील अनेक स्त्रिया एक नंबर आळशी.. महिलावर्गावर सोनालीचं परखड मत, व्हिडिओ व्हायरल

मुळात नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री जितकी सुंदर तितकीच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट आहे. 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये याचा अनुभव प्रेक्षकांना येईलच. यावेळी या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या शोमध्ये शेअर केल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com