Priya Berde Cried: ‘मी कधीचं बोलले नाही पण...’ सिनेसृष्टीवर भाष्य करताना भर पत्रकार परिषदेत रडल्या...

Priya Berde On Gautami Patil: नुकतंच प्रिया बेर्डेंनी मराठी सिनेसृष्टीतील काही गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे.
Priya Berde On Gautami Patil
Priya Berde On Gautami PatilSaamtv

Priya Berde On Marathi Cinema: डान्सर गौतमी पाटील नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. अवघ्या महाराष्ट्राला आपल्या दिलखेचक नृत्यशैलीने घायाळ करणाऱ्या गौतमीच्या कार्यक्रमात नेहमीच काहीतरी घडतं. गौतमीवर सर्वच क्षेत्रातून टीका होत असली तरी, तिनं काही डान्स शो करणं थांबवलं नाही. अशातच मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे (Actress Priya Berde) यांनी गौतमी पाटीलला खडेबोल सुनावले होते. नुकतंच प्रिया बेर्डेंनी मराठी सिनेसृष्टीतील काही गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे.

Priya Berde On Gautami Patil
Arjun Kapoor's sponsorship: ११ वर्षीय अनिशासाठी आधार बनला अर्जुन कपूर; चिमुकलीचे स्वप्न साकारण्यासाठी करणार मदत

यावेळी प्रिया बेर्डे पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ‘गेल्या ४० वर्षांपासून मी मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासून मी माझ्या अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सुरूवात केली आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणारी कुठलीही संस्था नाही. कोरोना वैश्विक महामारीनंतर सर्वच जग मोठ्या उमेदीने उंच भरारी घेत आहे. इंडस्ट्रीमध्ये नेहमीच कलाकार आणि इतर लोकांमध्ये भेदभाव केला होतो.’

सोबतच, ‘राज्यातील नाट्यगृहाची दुरावस्था सध्या सर्वांनाच माहित आहे. अनेकदा अनेक कलाकारांनी नाट्यगृहाची दुरावस्था दाखवली आहे. राज्यातील नाट्यगृहाची स्थिती अधिकच चांगली व्हावी यासाठी संबंधित खात्याची मंत्र्यांनी २५ कोटी रुपयांचा निधी देखील दिला आहे.’ सध्याच्या कलाकरांची अवस्था पाहून प्रिया बेर्डे यांच्या डोळ्यात अश्रु आले होते. एका ठिकाणी पत्रकारांसोबत संवाद साधताना प्रिया बेर्डेंना भर पत्रकार परिषदेत अश्रु अनावर झाले.

Priya Berde On Gautami Patil
Gautami Patil New Film: गौतमीचं पुन्हा नशीब पालटलं; लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्षित...

यावेळी प्रिया बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला यावरही पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या, ‘भाजपमध्ये काम करण्याचा स्पेस मिळावा म्हणून मी भाजप मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना मला कामाच्या खूपच मर्यादा होत्या. माझं काम सर्वत्र मर्यादित आहे. भाजपा नेते कोणत्याही कामात लगेचच मदत करतात. मला प्रसिद्ध व्हायची इच्छा नाही. आतापर्यंत सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्लक्षित होता. या विभागाला नेहमीच प्रचारापुरतेच गृहित धरले जायचे. पण आता तसं होणार नसून प्रत्येक कलाकराला न्याय मिळेल.’

यावेळी प्रिया बेर्डेंनी गौतमी पाटीलवर बोलणंच टाळले आहे. प्रिया बेर्डे म्हणतात, ‘मला याविषयावर काहीही बोलायचं नाही. मी त्या विषयावर आधीच बोलले होते. मी कधीचं बोलले नाही पण मला विचारलं.’ असं म्हणत त्यांनी गौतमी पाटील या विषयावर बोलणं टाळले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com