
देवदास, हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटांतून आणि बऱ्याच मराठी चित्रपट, मालिकांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी काम केले आहे. स्मिता जयकर सध्या सिनेसृष्टीपासून दुर आहेत. स्मिता जयकर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ चित्रपटामध्ये शेवटच्या दिसल्या होत्या. कलाक्षेत्रात जरी त्या सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर अपडेट शेअर करत असतात.
नुकतंच अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तांदळाने बनवलेल्या गणपतीचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांच्या घरात चालत आलेल्या परंपरेविषयी सुद्धा त्यांनी सांगितले आहे.
सध्या गणेशोत्सवाची धुमधाम संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांपासून अनेक सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अशातच मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या घरी ही गणरायाचे आगमन झाले आहे. त्यांच्या घरी म्हणजे जयकर कुटुंबाबत एक वेगळी परंपरा आहे. जयकर कुटुंबात तांदळापासून गणपती साकारला जातो. स्मिता जयकर यांच्या घरातील ही परंपरा १५० वर्षांपासून सुरू आहे. अशी माहिती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
घरातील गणपती फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन देखील दिले आहे. अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणतात, “ही आमची कौटुंबिक परंपरा आहे. जयकर कुटुंबीयांचा तांदळाचा गणपती बाप्पा, आमच्याकडे गेल्या १५० वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. सोबतच चाहत्यांसह त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांनी स्मिता यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. (Actress)
स्मिता जयकर यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, त्यांच्या सिनेकारकिर्दिला १९८८ पासून सुरुवात झाली आहे. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच मराठी चित्रपटांसह, मालिकेत आणि हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. स्मिता यांना ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेने त्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली. स्मिता यांचा अखेरचा चित्रपट ‘मिमी’ ठरला आहे. (Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.