Sonali Kulkarni Video: भारतातील अनेक स्त्रिया एक नंबर आळशी.. महिलावर्गावर सोनालीचं परखड मत, व्हिडिओ व्हायरल

Marathi Actress Sonali Kulkarni: नुकत्याच एका कार्यक्रमात सोनालीने स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केले आहे.
Sonali Kulkarni Share her opinion gender equality
Sonali Kulkarni Share her opinion gender equality Instagram @sonalikul

Sonali Kulkarni Viral Video: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. तसेच ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील चर्चेत असते. नुकत्याच एका कार्यक्रमात सोनालीने स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केले आहे.

सोनालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सांगत आहे की, समाजात काही महिला आहेत ज्या चांगल्या नोकरी, स्वतःचे घर आणि इतर सुखसोयी असलेल्या नवरा मिळावा असाही अपेक्षा करतात, परंतु स्वत: काम करण्यास नकार देतात. तर सोनालीने, मुलींना प्रोत्साहन आणि शिक्षण देण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांना सक्षम बनवा जेणेकरून त्या स्वतःचा खर्च करू शकतील, अशी सांगितले आहे.

सोनालीच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली म्हणत आहे की, "भारतातील अनेक स्त्रिया या आळशी झाल्या आहेत. त्यांना चांगली नोकरी, स्वतःचे घर, पगारवाढची हमी असलेला नवरा हवं आहे , पण स्वतःसाठी काय करायचे आहे हे त्यांना माहीत नाही.

Sonali Kulkarni Share her opinion gender equality
Sana Khan Post: आई होणार गं! मौलवीशी लग्न केल्यानंतर बॉलिवूड रामराम केलेली सना लवकरच होणार आई

"मला प्रत्येकाला सल्ला द्यावासा वाटतो की तुमच्या घरातील महिलांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना पुरेसे सक्षम बनवा जेणेकरुन त्या स्वत:चा उदरनिर्वाह करू शकतील, घरातील खर्च त्याच्या जोडीदारासोबत शेअर करू शकतील."

तसेच सोनालीने पुरुषांना देखील पाठिंबा दिला आहे. भारतीय समाजात 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुटुंबासाठी कमाई सुरू करण्यासाठी महिलांपेक्षा त्यांना जास्त दबाव पुरुषांवर असतो, असे सोनालीने म्हटले आहे.

"सर्वच स्त्रिया अशा नसतात. पण हा आक्रमकपणा आणि ही मागणी करणारा स्वभाव खूप वाढला आहे. आपण नम्रतेने आणि समानतेने परिस्थिती पाहिली पाहिजे. बिल भरणे आणि किराणा सामान खरेदी करणे हे केवळ पुरुषांपुरते मर्यादित नसावे." असे सोनालीने सांगितले आहे.

स्वत: एक महिला असूनही ती या विषयावर बोलली आणि पुरुषांना पाठिंबा दिला, असे म्हटले अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचे कौतुक केले आहे. व्हिडीओ व्हायरलमधील सोनालीचे हे मत अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

"स्पॉट ऑन, कोणीतरी हे बोलले म्हणून आनंद झाला! हा पक्षपात घरातूनच सुरू होतो, पालक जेव्हा आर्थिक बाबींचा विचार करतात तेव्हा मुलींकडून नव्हे तर मुलांकडून अपेक्षा करतात. स्त्रीची कमाई ही तिची स्वतःची असते, तर पुरुष म्हणून सर्वांसाठी कमवावे लागते. स्त्रिया कधीही समान नसतात जोपर्यंत त्या पुरुषांसोबत सर्व जबाबदाऱ्यांसाठी सामान लढतात,” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

दुसर्‍या नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, "पोटगी देण्यावरही बंदी घालणे ही काळाची गरज आहे. जर मुली लोकोमोटिव्ह चालवण्यापासून ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर रेजिमेंटच्या प्रमुख तुकडीपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावत असतील, तर घटस्फोटानंतर पोटगी का मागतात? ?"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com