Spruha Joshi Video: 'पापा केहेते है बडा नाम करेगी...', खेकडा खायला शिकवणाऱ्या स्पृहा जोशीची नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Spruha Joshi Teach How To Eat Crabs: स्पृहा जोशीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Spruha Joshi Teach How To Eat Crabs
Spruha Joshi Teach How To Eat CrabsSaam tv

Marathi Actress Spruha Joshi News:

मराठमोठी अभिनेत्री स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi) सोशल मीडियावर (Social Media) नेहमी चर्चेत असते. सध्या वेगळ्याच कारणामुळे स्पृहा जोशी चर्चेत आली असून नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. खेकडा कसा खायचा हे शिकवणाऱ्या स्पृहा जोशीची नेटिझन्सनी अक्षरश: शाळा घेतली आहे. नेमकं हे काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

Spruha Joshi Teach How To Eat Crabs
Welcome 3 Teaser: अक्षय कुमारने स्वतःसह चाहत्यांना दिले खास गिफ्ट; 'वेलकम 3'चा टीझर केला शेअर

नुकताच स्पृहा जोशीने असोवा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी स्पृहासोबत अभिनेता विनोद गायकर हा देखील होता. या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही कलाकारांनी मुंबईमधील एका हॉटेलमध्ये नॉनव्हेज फूड खाल्ले. यावेळी स्पृहाने खेकडा कसा खायचा हे सांगितल्याचे दिसत आहे. यावेळी स्पृहा असे सांगितले की, 'खेकडा खाताना फॅन्सी वागू नये...तो हातानेच खायचा.'

Spruha Joshi Teach How To Eat Crabs
Gadar- 2 Movie Box Office Collection: 'गदर- 2' ने मोडला 'बाहुबली- 2' चा रेकॉर्ड, सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी चित्रपट

स्पृहा जोशीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असोवा या युट्युब चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला 'खेकडा कसा खावा? याचं Tutorial by स्पृहा जोशी' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर नेटिझन्सने कमेंट्स करत स्पृहाला ट्रोल केले आहे.

Spruha Joshi Teach How To Eat Crabs
Katrina Kaif Post: कतरिना कैफ लवकरच देणार गुड न्यूज; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

या पोस्टवर 'जोशींची ना तु??', “बाई देवाला तरी घाबर”, 'अरे ही जोशी आहे ना, आणि मांसाहारी खाते', 'स्पृहा आजपासून तुला अनफॉलो करतोय', 'अरे श्रावण चालू आहे', 'छान छान खाता हो जोशी खेकडा', 'पापा केहेते है बडा नाम करेगी', 'खेकडा खाके बडा काम करेगी', आणि 'जोशी वडेवाले वाट पाहत आहेत' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी स्पृहाच्या व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com