
Sagar Karande: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असतो. त्याने 'चला हवा येऊ द्या' आणि 'फू बाई फू' या कार्यक्रमामुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आला आहे. त्याच्या अभिनयामुळे आणि कॉमेडीमुळे चाहत्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. सोबतच सागर काही चित्रपटांमधुन ही प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सोबतच सागर सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’या नाटकात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सागरची तब्येत बिघडल्याने शेवटच्या क्षणी प्रयोग रद्द करण्यात आला. त्यानंतर सागर कारंडेच्या तब्येतीबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. नाटकाच्या प्रयोगादरम्यान सागरच्या छातीत दुखू लागल्यानं त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. सागर सध्या बरा असून घरी आराम करीत आहे. सागरने फेसबुक लाइव्ह करत त्याच्या तब्येतीविषयीची माहिती दिली आहे.
सागर फेसबूक लाईव्हमध्ये बोलला, 'काही दिवसांपूर्वी ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या नाटकाचा प्रयोग संध्याकाळी 4 वाजता साहित्य संघला आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अचानक माझ्या छातीत दुखू लागले. मला चक्करही आली.
दुपारी 12.30 ते1 च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर मी रुग्णालयात गेलो. माझ्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. माझे रिपोर्ट नॉर्मल आले. पण चेकअप वैगरे झाल्यानंतर मला डॉक्टरांनी प्रयोग करण्यास किंवा प्रवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला होता'.
'पण सुदैवाने ‘वासूची सासू’ची टीम त्याठिकाणी उभी राहिली आणि सर्व टीमचे खूप खूप आभार. कारण तो प्रयोग कॅन्सल न होता दुसरा प्रयोग का होईना तो झाला. मला अनेक दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते यांचे आभार मानायचे आहे. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून नाटक पुन्हा होऊ शकलं.' असेही तो यावेळी म्हणाला.
यामुळे सागरची दुखत होती छाती
छातीत दुखण्यामागचे कारण काय असू शकते याच्या अनेक चाचण्या केल्या. दिवसातून चार ते पाच वेळा ईसीजी करण्यात येत होता. तसेच 2 D Eco करण्यात आले,ती एक ठराविक चाचणी असते तीही करण्यात आली होती. हे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी गेल्या काही दिवसात माझ्या कामाबद्दल चौकशी केली.
गेला आठवडाभर मी दररोज प्रवास करत होतो. रात्री शूटींग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, जेवण वेळेवर नव्हतं, त्यादिवशी मी काही खाल्लं नसल्याने अॅसिडीटी झाली होती. अॅसिडीटी वाढल्याने छातीत दुखत होतं. असं डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं होते.
कालही माझी एक चाचणी करण्यात आली. त्याचेही रिपोर्ट नॉर्मल आहेत. आताही एका चाचणीसाठी जायचं आहे. डॉक्टरांनी नुकतंच मला डिस्चार्ज दिलाय. पण मी ठणठणीत आहे. मी तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ मी बरा आहे. मला काहीही झालेले नाही”, असे सागर कारंडेने यावेळी सांगितले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.