Baloch Release Date: तारीख ठरली, मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच' लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार...

पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे.
Balooch Release Date
Balooch Release DateSaam Tv

Baloch Release Date: सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित 'बलोच' या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून सोबतच 'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे.

Balooch Release Date
Preity Zinta Family: अवघ्या लहान वयातच कोसळला प्रीती झिंटावर दुःखाचा डोंगर, हे सर्व सावरत झाली यशस्वी अभिनेत्री

येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. आजवर देशांसाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई आपण पडद्यावर पाहिली. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती.

मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे. 'बलोच'च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे.

Balooch Release Date
Preity Zinta: प्रीतीकडे एकही चित्रपट नसताना कोट्यवधी कमावते, नेटवर्थ वाचाल तर बसेल दातखिळी...

चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com