Get Together Trailer: पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट २६ मे रोजी उलगडणार; देवमाणूस मधील ‘तो’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत...

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या ‘गेट टुगेदर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Get Together Trailer
Get Together TrailerSaam Tv

Get Together Trailer: पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या ‘गेट टुगेदर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.

तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना समाजमाध्यमांतून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. (Latest Entertainment News)

Get Together Trailer
Isha Talwar Injured: मिर्झापूर फेम अभिनेत्रीचा सेटवर अपघात; फायरिंग सीनदरम्यान डोळ्याला झाली गंभीर इजा...

आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा, कॉलेजमध्ये गवसतं. पण हे प्रेम यशस्वी होतंच असं नाही. पण पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नव्याने करून देतो. रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टूगेदर हा चित्रपट नक्कीच करून देईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com