‘Ghar Bandook Biryaani’ तील मोस्ट वॉन्टेड गुंडांची नावे आले समोर, साकारणार ‘हे’ कलाकार गुंडांची पात्र

'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील प्रमुख कलाकारांची नावं समोर आल्यानंतर आता चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड 'डाकू गँग' समोर आली आहे. सोशल मीडियावर या 'डाकू गँग'चे पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत.
Ghar Bandook Biryaani Characters Poster
Ghar Bandook Biryaani Characters PosterInstagram/ @nagraj_manjule

Ghar Bandook Biryaani Characters: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख कलाकार सर्वांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड 'डाकू गँग' समोर आली आहे. सोशल मीडियावर या 'डाकू गँग'चे पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत.

Ghar Bandook Biryaani Characters Poster
Rashmika Madanna: नॅशनल क्रशची मराठी सिने अवॉर्डमध्ये ठसकेबाज लावणी सादर होणार, चर्चा रंगणार बातमी गाजणार!

या गॅंगमध्ये श्वेतांबरी घुडे, विठ्ठल काळे, नीरज जमगाडे- मायकल, सोमनाथ अवघडे, संतोष व्हडगीर (नाईक ), ललित मटाले, प्रवीण डाळिंबकर, किरण ठोके, सुरज पवार, किशोर निलेवाडी, प्रियांशू छेत्री- बाबू , सुभाष कांबळे, गिरीश कोरवी, चरण जाधव, अशोक कानगुडे, आशिष खाचणे यांचा समावेश आहे. या डाकू गँगची सुनावणी येत्या ७ एप्रिलला जवळच्या चित्रपटगृहात होणार आहे.

या 'डाकू गँग'च्या झळकलेल्या पोस्टरवर त्यांनी ॲक्टिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुनावणीदरम्यान काय निकाल लागणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

या कलाकारांबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, “या सगळ्या कलाकारांचे काम मी पाहिले आहे. काहींसोबत काम केले आहे. हे सगळेच कलाकार खूप मेहनती आहेत. सर्वांनीच खूप चांगले काम केले आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील हे कलाकार असल्याने प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांचा अभिनय हा अधिक नैसर्गिक वाटतो.”

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com