Maharashtra Shaheer Trailer: महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी झटणाऱ्या शाहिर साबळेंच्या आयुष्याची झलक ट्रेलरमधून.. उत्सुकता आणखी शिगेला

बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या सांगितिक पर्वणी ठरणाऱ्या आणि बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे काल अर्थात मंगळवारी ११ एप्रिलला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ट्रेलरचे प्रदर्शन करण्यात आले.
Maharashtra Shaheer Trailer
Maharashtra Shaheer TrailerSaam Tv

Maharashtra Shaheer Trailer Out: बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या सांगितिक पर्वणी ठरणाऱ्या आणि बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे काल अर्थात मंगळवारी ११ एप्रिलला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ट्रेलरचे प्रदर्शन करण्यात आले. शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

चित्रपटात उत्तमोत्तम दर्जेदार गाणी, भावनिक प्रसंग आणि सामाजिक-राजकीय प्रसंगांमधून सर्वांगसुंदर असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सने केली आहे.

मराठी सिनेसृष्टीला आजवर अनेक हिट चित्रपट दिलेले लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आजोबांवरील या जीवनपटाचे दिग्दर्शन केले आहे. नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या या ट्रेलर लॉंचिंग कार्यक्रमाला निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरच चित्रपटातील आघाडीचे कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे सोबत इतर मंडळीही उपस्थित होते.

Maharashtra Shaheer Trailer
Aditya- Ananya Relationship: अनन्या- आदित्य रिलेशनमध्ये?; अनन्याच्या आईने होत असलेल्या चर्चेवर सोडले मौन

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्व शालेय मुलांपर्यंत नेण्याचे काम शासन करेल, अशी घोषणा केली. यावेळी उदय सामंत म्हणाले, “मी संयुक्त महाराष्ट्र चळवळ पाहिलेली नाही, पण त्याबद्दल वाचले आहे. लोककलेतून आणि जनजागृतीतून काय आव्हान उभे करता येते ते शाहिरांनी त्यावेळी दाखवून दिले. शाहीर साबळे कोण? हे आजच्या भावी पीढीला कळावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यासाठी मी निर्माते संजय छाब्रिया यांचे आभार मानतो. अशा चित्रपटांच्या मागे शासनाने उभे राहिले पाहिजे ही माझी भूमिका आहे. हे लोकशाहीर पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत म्हणून शासनातर्फे हा चित्रपट सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्यापर्यंत लोककला पोहोचावी याची तजवीज करण्याची जबाबदारी मी स्वीकारत आहे.”

Maharashtra Shaheer Trailer
अक्षयच्या हातातून आणखी एक सिक्वेल जाणार? ‘Rowdy Rathore 2’मध्ये दिसणार ‘हा’ बॉलिवूड सेलिब्रिटी

सोबतच पुढे सामंत म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या २८ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शनासाठी येणार आहेत. तशी मी आग्रही भूमिका त्यांच्यासमोर मांडेन. ते यावेळी चित्रपट आणि शाहीर साबळे यांच्याबद्दल ज्या काही घोषणा करायच्या असतील त्या करतील. मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना मुंबई विद्यापिठातील शाहिरांच्या नावाने असलेल्या भारतातील पहिल्या अध्यासनाला ३ कोटी रुपयांची मदत मला करता आली याचा मला आनंद आहे. केदार शिंदे यांचा मित्र म्हणून शासन दरबारी मी या चित्रपटासाठी जे जे म्हणून करण्याची गरज असेल ते सर्व करेन, याची ग्वाही देतो.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

‘महाराष्ट्र शाहीर’चे पात्र अंकुश चौधरीने साकारले आहे, यावेळी तो म्हणाला, “तीन वर्षांच्या मेहनतीनंतर एक सर्वांगसुंदर असा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट आपण आणि नव्या पिढीने आवर्जून पाहावा आणि आपण त्यांना तो दाखवावा, असा आहे. त्यातूनच पुढील पिढीला लोककला, लोकसंस्कृती कळेल, त्यावेळचे विचार, राष्ट्राभिमान, महाराष्ट्राभीमान, मराठीचा अभिमान काय असतो याची जाणीव होईल. शाहिरांची तगमग, प्रगल्भता, विचार या चित्रपटातून प्रगट होतात. यात शाहिरांचे एक नवीन गाणे घेण्यात आले आहे. ते अत्तापर्यंत गुलदस्त्यात होते. ते लोकांना भावते आहे. मला पूर्ण खात्री आहे की २८ एप्रिल रोजी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षक बरेच काही भरभरून घरी घेवून जाणार आहेत.”

‘महाराष्ट्र भूमी बहुगुणी...’ या गाण्यापासून ट्रेलरला सुरुवात होते आणि गाणे सुरू होताच अंगावर रोमांच उभे राहतात. उत्तरोत्तर चित्रपटाचा बाज ध्यानी येतो. “रुकीये मिस्टर साबळे, यु कान्ट सिंग लाईक धिस, द वर्ड महाराष्ट्र कॅनॉट कम सो मेनी टाईम्स...” असे म्हणत एका प्रसंगी शाहिरांना थांबविले जाते. त्यावर शाहीर बाणेदारपाने उत्तर देतात्त, “मग छत्रपती कुठे जन्माला आले म्हणून सांगायचे, “दिल्ली की कलकत्ता?” शाहिरांचा बाणेदारपणा, कणखर व ठोक विचार, बंडखोर वृत्ती इतरही अनेक प्रसंगांमध्ये समोर येते. मग “म्या गानार, माझं तगडं तोडलंस तरी म्या गानार...” हे आईला दिलेलं उत्तर, एका राजकीय नेत्याला “आम्ही कलाकार आहोत कुणाचे मिंधे नाहीत,” अशी दिलेली चपराक या गोष्टी ट्रेलरमध्ये शाहिरांचे व्यक्तिमत्त्व उभे करत जातात.

त्याचबरोबर त्यांच्या प्रेयसी आणि पत्नीबरोबरचे प्रसंग त्यांच्या आयुष्यातील नाजूक कप्पा अलगद फुलवतात. एक दिवस शाहीर भानुमती यांच्याशी लग्न करून थेट घरी घेऊन येतात आणि त्यांची आई त्यांच्यावर भडकते, असा एक प्रसंग आहे. त्याशिवाय भानुमती यांचे एक सशक्त व्यक्तिमत्त्व या कथेत पाहायला मिळते. “माझे ठरलंय, माझे काव्य तुमचा आवाज,” असे एका प्रसंगात त्या शाहिरांना सांगतात. त्यानंतर एका प्रसंगात त्या त्यांना सांगतात, “तुम्हालासुद्धा कळू दे माझ्या काव्याशिवाय तुमच्यातील शाहीर कुठवर जाऊ शकतो ते...” त्यानंतर काही सामाजिक-राजकीय संवाद या ट्रेलरमध्ये साकारतात आणि शाहिरांची सामाजिक बांधिलकी समोर येत जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर शाहीर सांगतात, “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे तुमचे धोरण आहे. त्या ८० टक्क्यांसाठी मी इथे आलो आहे.”

Maharashtra Shaheer Trailer
Mala Ka Bhase Song Out: प्रेमाची व्याख्या उलगडून सांगणारं ‘मला का भासे’ प्रेमगीत प्रदर्शित

ट्रेलर प्रदर्शनावेळी दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “शाहीर साबळे यांच्या आठव्या स्मृतीदिनी म्हणजे २० मार्च रोजी आम्ही चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. त्याला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा लोकांमध्ये असल्याची प्रतिक्रिया मिळते आहे. आजच्या ट्रेलरच्या माध्यमातून चित्रपटाबद्दलची ही उत्सुकता आणखी ताणली जाणार आहे. त्यांच्यावरील या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यातील भव्यदिव्य माणूस पुन्हा पुन्हा समोर येतो. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या या साऱ्या आठवणींना मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि त्यांचे हे अनेक पैलू पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी आम्ही त्यांच्या जीवनपटाचा घाट घातला. त्याची ही आणखी एक झलक आहे.”

ट्रेलर प्रदर्शनावेळी निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, “एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट ही दर्जेदार निर्मिती आणि चांगल्या कथांसाठी ओळखली जावी यासाठी आम्ही नेहमी आग्रही असतो. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सर्व बाबींची हमी देतो. आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे, आजचे शिखरावर असलेले संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांच्याबरोबर आम्हाला काम करता आले आणि त्यातून एक दर्जेदार चित्रपट निर्माण झाला आहे, याचा अम्हाला अभिमान आहे.”

Maharashtra Shaheer Trailer
Priya Berde Cried: ‘मी कधीचं बोलले नाही पण...’ सिनेसृष्टीवर भाष्य करताना भर पत्रकार परिषदेत रडल्या...

‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे! या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे.

‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ हा एक स्वतंत्र निर्मिती स्टुडीओ असून त्यांनी गेल्या एका दशकात २३ चित्रपटांची निर्मिती, प्रस्तुती केली आहे. उच्च निर्मितीमुल्ये आणि दर्जेदार कथा यांमुळे त्यांच्या चित्रपटांना बाजारमुल्य मोठे आहे. अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी दिले आहेत. मुंबई-पुणे-मुंबई, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही, तुकाराम, आजचा दिवस माझा, मोरया हे त्यांतील काही चित्रपट आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com