Hemant Dhome: हेमंत ढोमे पुन्हा भडकला; 'प्रेक्षकांसोबत असे वागणे कितपत योग्य…?'

अशातच कल्याणसह अनेक शहरातील थिएटरमध्ये ‘सनी’ चित्रपटाचे बुकिंग होऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले.
Marathi Film Director
Marathi Film Director Saam Tv

Hemant Dhome: मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. प्रेक्षक येऊनही जर शो रद्द होत असेल, तर हे चुकीचे आहे. असाच प्रकार घडला आहे, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत.

Marathi Film Director
Shriya Saran: बिनधास्त श्रीयानं विमानतळावरच सगळ्यांसमोर नवऱ्याला घेतलं चुंबन; नेटकरी भलतेच चिडले

नुकताच हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाली असून त्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे. अशातच कल्याणसह काही शहरांमधील थिएटरमध्ये ‘सनी’ चित्रपटाचे बुकिंग होऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले. याबाबत प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेंशी संपर्क साधला. हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चित्रपचटाचे शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत.

याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंन ढोमेने या प्रकरणावर आपली नाराजी व्यक्त करत म्हणतो, 'थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे.

बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला आहे. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?' असा सवाल हेमंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

Marathi Film Director
Kangana Ranaut: 'दृश्यम 2' च्या यशानंतर कंगणाने केले तब्बूचे कौतुक, म्हणाली 'बॉलिवूडची तारणहार तर तूच'

दिग्दर्शित हेमंत ढोमे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटाबद्दल झालेल्या कृत्यावरुन सोशल मीडियावरती पोस्ट बरीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टने थिएटर चालकांना थेट शो रद्द करणं चांगलेच महागात पडणार हे नक्की...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com