TDM Director's Big Decision: ‘टीडीएम’च्या दिग्दर्शकांचा महत्वपूर्ण निर्णय; ‘माफ करा ‘टीडीएम’ प्रदर्शन थांबवतोय!’...

नुकतंच दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेने फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला.
TDM Director's Big Decision
TDM Director's Big DecisionInstagram

TDM Director's Big Decision: ‘ख्वाडा’, ‘बबन’ या गावरान आणि अस्सल मराठमोळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे भाऊराव कऱ्हाडे सध्या कमालीचे चर्चेत आहेत. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. ‘टीडीएम’ चित्रपटाला आणि त्याच्या टीमला सध्या एका वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

थिएटर मालकांकडून चित्रपटाचे प्राईम- टाईम शो रद्द होत असल्याने चित्रपटाच्या टीमला भर थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या समोर रडू कोसळले. चित्रपटाच्या टीमला सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी चित्रपटाला सपोर्ट करत शो उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

TDM Director's Big Decision
Aai Kuthe Kay Karte: टीआरपीमध्ये अव्वल ठरलेल्या मालिकेत येणार प्रेमाचा नवा ट्वीस्ट; ‘ते’ तीन शब्द ऐकून आशुतोष झाला लाजून चुर

नुकतंच दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेने फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. लाईव्हमध्ये दिग्दर्शकांनी येत्या काळात आपण ‘टीडीएम’चित्रपटाचे शो मागे घेत असल्याची माहिती सांगितली. निर्मात्यांच्या वतीनं एक प्रसिद्धीपत्रकही सोशल मीडियावर जाहीर करण्यात आले आहे. (Marathi Film)

त्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले की, “रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.”

TDM Director's Big Decision
Salman Khan Instagram Post: जवळच्या व्यक्तीच्या निधनानं सलमान खानला झालं दु:ख, इन्स्टावर केली भावुक पोस्ट
TDM Director's Big Decision
TDM Director's Big DecisionSocial Media

प्रेक्षकहो, तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार! अशा शब्दांत दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चित्रपटाला थिएटर्समध्ये स्क्रिन न मिळाल्यानं कलाकारांनी काही दिवसांपूर्वी थिएटरमध्येच भर प्रेक्षकांसमोर रडत आपले गाऱ्हाणे मांडले होते. यामध्ये कलाकारांनी मराठी चित्रपटांवर कशाप्रकारे अन्याय होतोय, याबद्दल आपल्या लाईव्हमध्ये प्रेक्षकांना सांगितले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील ‘टीडीएम’ला पुरेशा स्क्रिन्स देण्यात याव्यात. असे ट्विट करत आवाहन केले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com