
Urmi Teaser Out: मल्टिस्टारर "उर्मी" या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे . प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून, १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समृद्धी क्रिएशननं 'उर्मी' चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विजय गटलेवार यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावली आहे.
या चित्रपटात अभिनेत्री रसिका सुनील, सायली संजीव अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर यांच्या मुख्य भूमिका असून ऋतुजा जुन्नरकर आणि सायली पराडकर या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय धमाल होते असं चित्रपटाची कथासूत्र असल्याचं चित्रपटाच्या टीजरवरून जाणवत आहे. त्यामुळे उत्तम स्टाकास्ट आणि धमाल गोष्ट असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. आता १४ एप्रिलला चित्रपटगृहात उर्मी पाहता येणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.