मराठी चित्रपटांना थिएटर नाही हे दुर्दैव - शरद पोंक्षे 

कर्नाटकात कानडी भाषा ही सक्तीची आहे, महाराष्ट्रात मराठी का होऊ शकत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Sharad Ponkshe
Sharad Ponkshesaam tv

डोंबिवली - आजही मराठी चित्रपटांना थिएटर नाही हे दुर्दैव आहे असे वक्तव्य कलाकार शरद पोंक्षे यांनी डोंबिवलीत (Dombivli) केले आहे. शरद पोंक्षे यांनी सांगितले की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला सर्व मिळाले पाहीजे पण ते होत नाही, कारण आमची इच्छाच नाही आहे. कर्नाटकात कानडी भाषा ही सक्तीची आहे, महाराष्ट्रात मराठी का होऊ शकत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे देखील पाहा -

मराठीला प्राईम टाईम शो देण्याचे कबुल केल्यानंतरच थिएटरला परमीशन मिळते, पण तेवढे शो मिळतात का हे कोणीच पहात नाही. सगळ्यांचेच एकमेकांबरोबर लागे बंध आहेत. सर्व पक्षांच्या आज चित्रपट संघटना आहेत, मात्र त्याही काही काम करत नाही. चित्रपट महामंडळ आहे ते ही काम करत नाही.

Sharad Ponkshe
FIFA चा भारताला मोठा धक्का; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन

त्यांनी मराठी चित्रपटांसाठी काही तरी करायला हवे असे परखड मत पोंक्षे यांनी व्यक्त केले. केवळ शो नाही म्हणून चित्रपट निर्मात्याचे किती नुकसान होते. दोन आठवड्यांनी शो मिळून काय फायदा. मराठीत शंभरातले दोन चित्रपट चालतात त्यात ही अवस्था असेल तर कसे होणार अशी चिंता देखील त्यानी व्यक्त केली.

तसेच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण सभागृह येथे रविवारी पार पडलेल्या या व्याख्यानात सावरकर अभ्यासक ज्येष्ठ वक्ते शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com