Sayaji Shinde News: अभिनेते सयाजी शिंदेवर मधमाशांचा हल्ला, पुणे-बंगलोर महामार्गावरील घटना

Sayaji Shinde Attacked by Bees: पुणे-बंगलोर महामार्गावर थांबलेल्या सयाजी शिंदेवर मधमाशांनी हल्ला केला आहे.
Sayaji Shinde Attack By Bees
Sayaji Shinde Attack By Beessaam tv

Pune-Bangalore Highway : अभिनेता सयाजी शिंदे आपल्या अभिनयासोबतच सामाजिक कार्यांमुळे देखील चर्चेत असतात. नेहमीच पर्यावरण संवर्धनाचं काम करणारे सयाजी शिंदे आपल्या कामामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पुणे-बंगलोर महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी थांबलेल्या सयाजी शिंदेवर मधमाशांनी हल्ला केला आहे.

Sayaji Shinde Attack By Bees
Amir Khan: आमिरचं टोपण नाव माहित आहे का? खुद्द त्यानेच केला खुलासा

पुणे बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. सयाजी शिंदेंवर मधमाशांनी हल्ला केल्यानंतर त्यांच्या आरोग्य संबंधित अद्याप अस्पष्ट आहे. सयाजी शिंदे हे अभिनयासोबतच समाजसेवेतील कामातही अग्रगण्य आहेत.

ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी समस्या आणि जंगल संवर्धनासाठी नेहमीच सयाजी शिंदे काम करतात. पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला आहे. पण याच कामा दरम्यान त्यांना ही दुखापत झाली.

Sayaji Shinde Attack By Bees
Happy Birthday Aamir Khan: चित्रपटाचे पोस्टर लावणारा आमिर आज बॉलिवूडमध्ये आहे सर्वोत्कृष्ट, संपत्ती पाहाल तर येईल आकडी

पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. तेथील झाडांसाठी सयाजी शिंदे तासवडे येथे गेले होते. कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्याचे पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली. पण याच दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे समजले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com