Marathi Movie: एकतर्फी प्रेमाची कलरफुल स्टोरी; 'आय प्रेम यु' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रेमाचा आणखी एक वेगळा पैलू 'आय प्रेम यु' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
I Prem You Marathi Movie Trailer Launch
I Prem You Marathi Movie Trailer Launch Saam TV

I Prem You Trailer Out: मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच हे चित्रपट वेगवगेळ्या धाटणीचे देखील आहेत. असाच एक एकतर्फी प्रेमावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका मुलीविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं प्रेमात होणारं रुपांतर आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडींचं चित्रण 'आय प्रेम यु' करण्यात आले आहे.

I Prem You Marathi Movie Trailer Launch
Nawazuddin Siddiqui Controversy: 'मौनने नेहमी शांतता मिळत नाही...' नवाजुद्दीन सिद्दिकीसाठी केलेली कंगनाची पोस्ट चर्चेत

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेमाचा आणखी एक वेगळा पैलू 'आय प्रेम यु' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

'आय प्रेम यु' या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुरसळ , नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनी चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शयाचीही धुरा सांभाळली आहे.

अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करत असून, कयादू आणि अभिजीत आमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे.

एकतर्फी प्रेमाला मिळणारी वागणूक, त्यातून होणारे मनोव्यापार या ट्रेलरमधून पाहायला मिळतात. कलरफुल आणि म्युझिकल अशी ही प्रेमकथा ट्रेलरमधूनच लक्ष वेधून घेत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com