
मिसळ म्हटल्यावर आपसुकच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. मिसळ हा अनेकांचा आवडतीचा पदार्थ असतो, पण सध्या सोशल मीडियावर ‘लंडन मिसळ’ची तुफान चर्चा सुरू आहे. आतापर्यंत आपण पुणेरी मिसळ, कोल्हापुरची मिसळ, नाशिकची मिसळ ऐकली असेल, पण सध्या ‘लंडन मिसळ’ची प्रचंड चर्चा सुरू आहे. ‘लंडन मिसळ’ हे कोणत्या दुकानाचं किंवा कोणत्या मिसळचं नाव नाही तर हे एका चित्रपटाचं नाव आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.
जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या एका नाटकावरून प्रेरित होत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नुकताच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि चित्रपटातील स्टारकास्टची घोषणा करण्यात आली आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. (Marathi Actors)
चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत, भरत जाधव, ऋतुजा बागवे, रितीका श्रोत्री, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे, माधुरी पवार, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनिल गोडबोले अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दुर राहिलेले भरत जाधव या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. नाटक असो किंवा चित्रपट कायमच आपल्या दर्जेदार अभिनयामुळे भरत जाधव चर्चेत असतात. येत्या काही दिवसातच भरत जाधव या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करत असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता दिसतेय. (Marathi Film)
कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटामध्ये आदिती आणि रावी या दोन सख्ख्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या दोन्हीही बहिणी लंडनमध्ये राहत असतात. लंडनमध्ये राहणाऱ्या या दोघी सख्ख्या बहिणी आपल्या वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिथे राहत असतात. तिथे त्यांना अनेक अडी- अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतो, त्याची कथा म्हणजे ‘लंडन मिसळ’ होय. नाटक, अभिनय, म्युझिक, डान्स, पोट धरून हसवणारा विनोद आणि झणझणीत मिसळ याचा मिलाप चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. (Entertainment News)
जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची भारतात आणि लंडनमध्ये शूटिंग झाली आहे. भरत जाधव खूप मोठ्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याने प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप सॉंग गायलं आहे. कायमच अभिनयात श्रेष्ठ असलेल्या भरत जाधव यांची नवी भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.