
सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक मराठी चित्रपटांची चलती आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली बाजी मारली आहे. मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते एका मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडलाय.
शुटिंगची सुरुवात मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते मुहूर्ताचा पहिला क्लॅप देण्यात आला. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी करणार आहे. सोबतच संदीप बंकेश्वर देखील चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपटामध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर, सोनाली कुलकर्णी आणि मिलिंद गुणाजी हे दिग्गज सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या घटनेवर आधारित आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (Marathi film)
चित्रपटाविषयी दिग्दर्शक अभिषेक गुणाजी सांगतात, “याआधी मी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मात्र स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून माझ्या सिनेकारकिर्दीतील हा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे उत्सुकता तर आहेच. पण तितकेच दडपणही आहे. मी दिग्दर्शन करत असलेल्या प्रोजेक्टला पूर्णपणे न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात मुंबई मध्ये झाली असून लवकरच चित्रपट तुमच्या भेटीला येईल. सध्या तरी चित्रपटाबद्दल काहीच सांगू शकत नसलो तरी ‘रावण कॅालिंग’ अनेक ट्विस्टने भरलेला असेल.” (Actors)
तर दिग्दर्शक संदीप बंकेश्वर चित्रपटाविषयी सांगतात, “चित्रपटाचा आशय- विषय खूप वेगळा आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, ‘रावण कॅालिंग’च्या निमित्ताने मी अनेक सुप्रसिद्ध कलाकारांसोबत जोडलोय. मुख्य भूमिकेत झळकलेल्या सगळ्याच कलाकारांची अभिनयाची एक विशिष्ट शैली आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा येणार हे नक्की. अभिषेक एक दिग्दर्शक म्हणून कामाविषयी खूपच शिस्तप्रिय दिग्दर्शक आहे.” (Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.