
Ved Box Office Collection: रितेश आणि जेनेलिया यांचा 'वेड' चित्रपटाला प्रेक्षकांचे भभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाच्या गाण्यांवर प्रेक्षक थिरकताना दिसत आहे. 'वेड' चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात तब्बल ५० करोडचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची क्रेझ चौथ्या आठवड्यात देखील कमी झालेली नाही. पाहूया या चित्रपटाचे चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच झालेले बॉक्स ऑफिसवरील कमाई.
३० डिसेंबर २०२२ला 'वेड' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जादू केली. या चित्रपटाने पाहीच्या आठड्यात करोडोंचा गल्ला जमावाला. पहिल्या आठव्यात या चित्रपटाने २०.६७ करोड आणि दुसऱ्या आठवड्यात २०.१८ करोडची कमाई केली आहे. तर तिसऱ्या आठवडा पूर्ण होण्याच्या आत या चित्रपटाने ५० करोडचा टप्पा पार केला होता.
चित्रपटासाठी चौथा आठवडा खूप स्पेशल आहे. कारण दिग्दर्शक रितेश देशमुख याने चित्रपटामध्ये काही बदल केले आहेत. प्रेक्षकांच्या मागणीनुसार रितेश चित्रपटामध्ये सत्या आणि श्रावणीवर आधारित एक रोमँटिक गाणे समाविष्ट केले आहे. तसेच चित्रपटातील तीन संवाद बदलले आहेत. याबाबत खुद्द रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरून सांगितले आहे.
चित्रपटामध्ये केलेल्या बदलानंतर शुक्रवारी म्हणजे चित्रपटाच्या चौथ्या आवठड्याच्या पहिल्या दिवशी १.३५ करोडची कमाई केली आहे. चौथ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने १.१० करोडची कमाई केली आहे. 'वेड' चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ५३. २५ करोड इतके झाले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही एक अभिमानाची बाब आहे. 'सैराट' चित्रपटानंतर 'वेड' चित्रपटाला इतके यश मिळाले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.