Entertainment News: 'झोंबिवली'ची दोन वर्षांची प्रतिक्षा आज संपणार

गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक झोंबिवली या चित्रपटाची वाट पाहात होते. आता तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून (ता. २६) प्रदर्शित होत आहे. झोंबिवलीच्या तिकीट विक्रीला मराठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे
Entertainment News: 'झोंबिवली'ची दोन वर्षांची प्रतिक्षा आज संपणार
Entertainment News: 'झोंबिवली'ची दोन वर्षांची प्रतिक्षा आज संपणार- Saam Tv

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक झोंबिवली या चित्रपटाची वाट पाहात होते. आता तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून (ता. २६) प्रदर्शित होत आहे. झोंबिवलीच्या तिकीट विक्रीला मराठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Marathi Movie Zombivli releasing today)

आदित्य सरपोतदार या तरुण दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांची प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगविषयी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले, "चित्रपटाच्या (Movie) प्रत्येक गाण्याला आणि टीझरला तसेच ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलीच, पण त्याचबरोबर २४ तारखेला सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगला सुद्धा चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद आम्हाला भारावून टाकणारा आहे. आता चित्रपटगृहात येऊन प्रेक्षक तो हाऊसफुल करतील हा विश्वास आहे".

संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) प्रदर्शित झालेल्या 'झोंबिवली'चं स्पेशल स्क्रिनिंग मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकारांसाठी आयोजित करण्यात आले होते. मराठीतल्या या पहिल्या परिपूर्ण 'झोंबी'पटासाठी 'झोंबिवली' टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टीने दिली आहे. अनेकांनी चित्रपटाच्या बाबतीत 'या वर्षाची दर्जेदार सुरुवात
करणारी कलाकृती'अशा शब्दांत कौतुक केलं आहे.

"हा चित्रपट चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण देईल असं वाटतं," असे दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक म्हणाले. "चित्रपटातील मेकअप, चित्रपटाचं संकलन यासाठी या चित्रपटाचं विशेष कौतुक आहे," असे दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर महेश लिमये म्हणाले. झोंबिवली चित्रपटाची निर्मिती योडली या निर्मिती संस्थेने केली आहे. झोंबिवली हा चित्रपट मराठीमध्ये आपली छाप उत्तम उमटवेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com