Purushottam Berde: ९ वर्षांनी पुरुषोत्तम बेर्डेंचं नवीन नाटक, ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी - सविता मालपेकर रंगभूमी गाजवणार

अनेक नानाविध भूमिकेंमधून आपला ठसा सर्वत्र उमटवणारे सर्जनशील मुशाफिरी ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे कलाक्षेत्रातील योगदान फार मोलाचे आहे.
Purushottam Berde New Marathi Natak
Purushottam Berde New Marathi NatakSaam Tv

Purushottam Berde New Marathi Natak: लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार आणि चित्रकार अनेक नानाविध भूमिकेंमधून आपला ठसा सर्वत्र उमटवणारे सर्जनशील मुशाफिरी ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे कलाक्षेत्रातील योगदान फार मोलाचे आहे.

कलेच्या वेगवेगळया माध्यमांतून व्यक्त होताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीवर त्यांच्या दांडग्या अभ्यासाची आणि सर्जनशीलतेची किनार दिसून आली आहे. अशा या हुकमी दिग्दर्शकाचे ‘सुमी आणि आम्ही’ हे नवं नाटकं रंगभूमीवर येत आहे.

विशेष म्हणजे या नाटकातून तब्ब्ल ९ वर्षांनी ते नाटयदिग्दर्शन करत आहेत. नाटकाच्या संगीत, नेपथ्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

Purushottam Berde New Marathi Natak
Palak Tiwari Relationship: सैफ अली खानच्या लेकाला डेट करतेस का? प्रश्नावर पलक तिवारीने दिलं खास उत्तर

राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित ‘सुमी आणि आम्ही’ हे नाटक एप्रिलच्या मध्यावर रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर लिखित, पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर, श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांचे असून सूत्रधार सुनील महाजन, संदीप विचारे आहेत.

Purushottam Berde New Marathi Natak
Bhola Box Office Collection 1 Week: मरगळलेला ‘भोला’ विकेंडमध्ये सुसाट.. भोला ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

एका कुटुंबाची कथा सांगणार हे नाटक आहे. आपल्या मुलीचं ‘सुमी’चं मिशन पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आई वडिलांची गोष्ट यात सांगितली आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाविषयी बोलताना पुरुषोत्तम बेर्डे सांगतात की, “माझं अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. त्या व्यापात नाट्य दिग्दर्शनासाठी वेळ मिळत नव्हता. राजन मोहाडीकर यांच्या सोबत मी आधी काम केलं होतं. माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडली आणि या नाटकाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. ही संधी साधत हे नाटक मी करायला घेतलं. बर्‍याच वेगवेगळया माध्यमातून मी नव्या कलाकृती रसिकांसाठी आणणार आहे. ‘सुमी आणि आम्ही’ ही त्यातील एक कलाकृती असून पारंपरिक बाज असलेलं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल.”

Purushottam Berde New Marathi Natak
Salman - Aishwarya Viral Video: सलमान, ऐश्वर्या आणि आराध्याचा 'तो' व्हिडीओ का होतोय व्हायरल?.. जाणून घ्या प्रकरण

आजपर्यंत ८ नाटकांचे लेखन, १० नाटकांचे दिग्दर्शन, एकूण ७५ व्यावसायिक नाटकांचे पार्श्वसंगीत, २५ नाटकांचे नेपथ्य, ५० व्यावसायिक नाटकांच्या जाहिरातींची संकल्पना याबरोबरच विविध चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन, साहित्यिक लिखाण करीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी सकस आणि दर्जेदार मेजवानी रसिकांना दिली.

पुरुषोत्तम बेर्डे यांचा १९७५ पासून सुरु झालेला हा प्रवास आजतागायत सुरु असून कामाठीपुरा (वेबसिरीज), कला पानी (चित्रपट), थरार...२६ जुलैचा (नाटक), जाऊबाई जोरात द्वितीय (नाटक) अशा विविध आगामी कलाकृती ते रसिकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येणार आहेत.

Purushottam Berde New Marathi Natak
Thalapathy Vijay On Instagram: नाद करा पण आमचा कुठं... थलपती विजयचे Instagram वर पदार्पण; अवघ्या तासातच मिलियनच्या घरात चाहते...

चित्रकला, जाहिरात, एकांकिका, नाटक, लेखन दिग्दर्शन, माहितीपट, चित्रपट, जाहिरातपट, वाद्यवृंद, संगीत दिग्दर्शन, नेपथ्य, कलादिग्दर्शन, स्फुट लेखन, व्यक्तिचित्र लेखन, लघुकथा लेखन, नाट्य आणि पटकथा लेखन, व्यंगचित्रे, इव्हेंट्स, आणि मालिका निर्मिती आणि लेखन, एकपात्री स्वकला प्रवास, विविध वाद्य वादन असा कलाप्रवास करणारा हा प्रतिभावान आणि ज्येष्ठ कलाकर्मी कलाप्रांत समृद्ध करत रसिकांना आनंद देतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com