
Shahid Kapoor Look At Kartiki Gaikwad Angrily: सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये टॉप ५ मधील कार्तिकी गायकवाडने आपली ओळख महाराष्ट्रातल्या घराघरात बनवली. लहान वयातच मोठा पल्ला गाठलेल्या कार्तिकीचा अवघ्या महाराष्ट्रात खूप मोठा चाहतावर्ग होता. तिच्या सर्वच गाण्यांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. कार्तिकीने डिसेंबर २०२० मध्ये रोनित पिसे सोबत लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर कार्तिकी कमालीची सक्रिय असते. सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टची बरीच चर्चा सुरू आहे. तिच्या त्या पोस्टची कमालीची चर्चा सुरू आहे.
कार्तिकी गायकवाडबद्दल बोलायचे तर, तिने आतापर्यंत अनेक मालिकांच्या टायटल साँगला, काही चित्रपटातील गाण्यांना आवाज दिले आहे. तिचे गाणे ऐकण्यासाठी चाहते आजही आवर्जून कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. नुकताच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी सिनेसृष्टीतील देखील काही कलाकार उपस्थित होते. पण त्या कार्यक्रमाला एका सेलिब्रिटीची उपस्थिती खूपच चर्चेत राहिली. तो म्हणजे, शाहिद कपूर. सध्या शाहिदचा आणि तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
तिने त्या कार्यक्रमाला वडिल आणि भावासोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित, सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक आणि शाहिद कपूर देखील उपस्थित होता. तिने या सर्वांसोबत फोटो देखील शेअर केले आहेत. शाहिद कपूरच्या फोटोमधील पोजमुळे सध्या सोशल मीडियावर तो बराच चर्चेत आला आहे.
कार्तिकीने शेअर केलेल्या पोस्टमधील एका फोटोत कार्तिकी तिचे वडील आणि सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासोबत फोटो काढत होती. त्यादरम्यान त्यांच्या मागे, अचानक बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर तिथे आला आणि नेमका फोटो काढला. त्यामुळे चुकून का होईना शाहिद त्या फोटोमध्ये आला. शिवाय त्याला ते फोटो काढत असल्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा चेहरा देखील विचित्र पद्धतीने आला. नेटकऱ्यांनी शाहिदचा हा फोटो पाहून असं वाटतंय की तो रागाने कार्तिकीकडे पाहतोय.
सध्या कार्तिकीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. युजर्सने कार्तिकी गायकवाड आणि शाहिद कपूरला तुफान ट्रोल केलंय. एक युजर म्हणतो, अगं कार्तिकी तुझं लक्ष कुठेय, शाहिद तुझ्याकडे बघतोय. तर आणखी एक म्हणतो, तेरा ध्यान किधर है, तेरा हिरो इधर है हे गाणं पोस्ट केलं आहे. तर काहींनी त्यांच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.