
‘ताली’ फेम सुव्रत जोशी सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुव्रतने सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या या वेब सीरिजमध्ये एका तृतीयपंथीयाचे पात्र त्याने साकारलेय. सध्या त्याची भूमिका प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले स्पष्ट आणि परखड मत मांडण्याचा प्रयत्न करतो.
नुकताच अभिनेत्याची एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. दरम्यान अभिनेत्याने त्या पोस्टमध्ये बँकॉकमधील भाजी मंडईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्या व्हिडीओच्या खाली त्याने त्याच्या आवडीच्या गोष्टीवर भाष्य केलंय. (Actors)
अभिनेता आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “जगात कुठेही गेलं की मला साद घालते ती तिथली मंडई! अगदी लंडन मध्ये असताना देखील हॅमरस्मिथ (hammersmith) मार्केटमध्ये जाणे हा माझा दिवसातील अत्यंत आनंदाचा भाग! बऱ्याच लोकांना बॅगा, घड्याळे, कपडे, अत्तर या अश्या गोष्टींची भुरळ पडते. मला स्थानिक भाज्या, फळे, मसाले, फुले वगैरे यांची! एकदा माझ्या एका actress मैत्रिणी सोबत गप्पा मारत होतो आणि विषय निघाला, तर मी तिला म्हटले मला कितीही लोक ओळखू देत, माझ्या आनंदासाठी मी शेवटपर्यंत मी भाजी बाजाराला जाणार! लोक खूप श्रीमंत अथवा प्रसिद्ध झाल्यावर स्वतःसाठी बोटी, बंगले घेतात. मी कदाचित स्वतःचा भाजी बाजार उभा करीन. ”
आपल्या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतो, “प्रत्येक ठिकाणच्या भाजी बाजारात गेल्यावर तेथील लोकांच्या जगण्याविषयी, खाद्य संस्कृती विषयी जे साक्षात्कार होतात ते टुरिस्ट ब्लॉगवर मिळणाऱ्या सल्ल्यांमधील खानावळीत जाऊन होत नाहीत. एक गोष्ट नक्की की काही अपवाद वगळता प्रत्यकेच ठिकाणी लोक त्यांच्या प्रकृतीनुसार आहार घेतात. तो सुयोग्य असतो. भारताइतके उत्कृष्ट शाकाहारी जेवण कुठेही मिळत नाही. त्यात भारत मला तरी एक नंबर वाटतो. पण म्हणून केवळ आपल्याकडेच फक्त शास्त्रीय पद्धतीने अन्नग्रहण होते हे काही खरे नाही,तसे ते जवळ जवळ प्रत्येक ठिकाणी होते. पुन्हा मांसाहार बद्दल आपल्या इथे अनेक अशास्त्रीय गैरसमज पसरवले गेले आहेत.” (Entertainment News)
आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात सुव्रत म्हणाला, “शाकाहार उत्तमच! परंतु विशिष्ट मांस खाल्ले की स्खलन होते वगैरेला छेद देणाऱ्या गोष्टी ढळढळीतपणे दिसून येतात. अन्यथा दिवसरात्र मांसाहार करणारे देश आपल्या तुलनेत अत्यंत आनंदी, शांततापूर्ण, सभ्य, शीलवान कसे आहेत? भूतान हे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण, थायलंड मध्ये देखील तोच अनुभव! असो. खऱ्या अध्यात्मिक प्रगतीसाठी भय, लज्जा, घृणा यापासून मुक्त होणे आवश्यक असते असे म्हणतात. विविध ठिकाणचे हे खाणे पिणे पाहिले, त्यातील काही करून पाहिले की आपले पूर्वग्रह काहीसे सैल नक्की होतात आणि भय, लज्जा किंवा घृणा याच्या थोडे पलीकडचे दिसते हे नक्की. त्या अर्थाने भाजी घेणे किंवा किडे खाऊन पाहणे हा माझ्यासाठी अध्यात्मिक अनुभव आहे..”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.