Ved Movie: रितेश-जेनेलियानं अख्ख्या महाराष्ट्राला 'वेड' लावलं; चित्रपटाची सैराट कामगिरी

'वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिस एक मोठा टप्पा पार केला आहे.
Ved Movie Box Office Collection Update
Ved Movie Box Office Collection UpdateInstagram @riteishd

Ved Movie Cross 50 Crore: गेली अनेक दिवस 'वेड' चित्रपटाचे वेड सगळ्यांनी पहिले. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जादू करत अनेक रेकॉर्ड मोडले तसेच काही नवीन रेकॉर्ड बनवले देखील. 'वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिस एक मोठा टप्पा पार केला आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देखमुख यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. रितेश आणि जेनेलियाने चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केल्याचे सांगितले आहे.

Ved Movie Box Office Collection Update
Rakhi Sawant Arrested : राखी सावंतला अटक? मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप

रितेश आणि जेनेलियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी 'Unstoppabale 50 CR' म्हटले आहे. तसेच त्यांनी 'शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!', असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

तीन आठवड्याच्या आत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० करोडचा टप्पा पार केला आहे. मराठी चित्रपटासाठी ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०. ६७ करोड तर दुसऱ्या आठवड्यात २०. १८ करोडचा गल्ला जमावाला होता.

या चित्रपटामध्ये आता बदल होणार आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवड्यांनी हे बदल करण्यात येणार आहेत. चित्रपटामध्ये रितेश-जेनेलिया म्हणजेच सत्या आणि श्रावणी यांच्यावर आधारित एक रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा रितेश आणि जेनेलिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com