
Kushal Badrike: कुशल बद्रिकेचे नाव उच्चारल्यावर आपोआपच 'चला हवा येऊ द्या' हा रिअॅलिटी शो आपल्या डोळ्यासमोर येतो. कुशल बऱ्याचदा कधी कामानिमित्त तर कधी सहज भटकंती करत असतो. त्याच्या भटकंतीच्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते.
एक फोटो असला तरी तो हमखास फोटो शेअर करतोच. त्याच्या अभिनयाने आणि मनोरंजनाने तो सर्वांनाच हसवतो. त्याच्या कॉमेडीसोबतच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टचीही चर्चा अधिक असते. त्याच्या पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचे लक्षवेधले आहे.
कलाकारांनी दिवाळीचा सण निश्चिंत राहून मोठ्या थाटात दिवाळीचा सण साजरा केला. प्रत्येक जण आपापल्या परिने दिवाळी साजरी करत होते. कुशलने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर दिवाळीची एक भन्नाट आठवण शेअर करत दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
कुशलने फटाके फोडताना एक फोटो शेअर करत लिहिले की, ''ही एक खोड मला बालपणापासून आहे, वात नसलेले आणि न पेटलेले ''फटाके'' गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही. आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही मला वाटतं''
तसेच त्याने पुढे लिहिले की, "दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले तर तुकड्या तुकड्यात "चकली, शंकरपाळ्या" सापडतात ना! डब्याच्या तळाशी "करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखस" मध्ये मिसळलेला जरासा "चिवडा" सापडतोच ना!
तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं "बालपण" आपल्याला सापडतच !! फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत, तळाशी कुठेतरी असतच हे "बालपण" "अगदी लाडवातल्या "मनुक्या" एवढ का होईना, ते आपल्यात उरतच" अशी खोडकळ पोस्ट त्याने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.
कुशलने लिहिलेली पोस्ट चाहत्यांना आवडली आहे. चाहत्यांसोबतच कलाकार मित्रांनी त्याच्या या पोस्टवर 'किती छान लिहितोस', 'कुशल सर, कधी कधी वाटतं की तुम्ही चुकीच्या फील्ड मध्ये आहात...जरा अजून लक्ष दिले तर तुम्ही योगेश आणि निलेश चा जॉब खाऊ शकता....' अशा कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Edit By: Chetan Bodke
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.