
Ram Charan In Good Morning Amerika Talk Show: काल राम चरण त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत होता. आरआरआर चित्रपटातील गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. त्यासाठी राम चरण अमेरिकेत गेला आहे. मेगास्टार चिरंजीवी यांनी अभिनेता आणि मुलगा राम चरण लोकप्रिय टॉक शो ‘गुड मॉर्निंग अमेरिका’ मध्ये दिसल्याने आनंद व्यक्त केला आहे.
चिरंजीवी यांनी हा तेलगू आणि भारतीय चित्रपटांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. टॉलिवूडच्या मेगास्टार चिरंजीवी यांनी गुरुवारी ट्विटर करत मुलगा राम चरणबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शोमध्ये राम चरणने 'RRR' चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचे वर्णन "भारतातील स्टीव्हन स्पीलबर्ग" असे केले. राम चरण पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्करआधी दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये सहभागी झाला होता.
'एका उत्कट कल्पनाशक्तीवर आधारित दूरदर्शी राजामौली यांच्या मेंदूत जन्मलेली उत्कट कल्पना आश्चर्यकारक आहे.' असे चिरंजीवी यांनी लिहिले. लेखिका आणि निर्माती कोना वेंकट यांनी तेलुगू प्रेक्षकांसाठी, प्रत्येक भारतीयासाठी आणि राम चरणच्या प्रत्येक मित्रासाठी हा "अभिमानाचा क्षण" असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शोमध्ये बोलताना, राम चरणने राजामौलीबद्दल म्हटले की, "पुढील चित्रपटासह लवकरच जागतिक चित्रपटसृष्टीत प्रवेश करतील." राजामौलीचा पुढचा चित्रपट, योगायोगाने, महेश बाबू अभिनीत साहसी चित्रपट आहे. "ते भारतातील स्टीव्हन स्पीलबर्ग म्हणून ओळखले जातात," असे राम चरण म्हणाला. जेव्हा होस्टने विचारले की 'RRR'ची कथा काय आहे, तेव्हा राम चरण म्हणाले: "हा चित्रपट मैत्री, बंधुत्व, सौहार्द, आणि या दोन पात्रांमधील नातेसंबंध आहे."
गोल्डन ग्लोब जिंकणारा 'RRR'मधील गाणे, 'नाटू नाटू' 95 व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याच्या शर्यतीत आहे. ऑस्करच्या तयारीत असलेला हा चित्रपट ३ मार्च रोजी संपूर्ण यूएसमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
राम चरण यांनी गुड मॉर्निंग अमेरिका’ला सांगितले: “हे फक्त ‘RRR’ नाही, तर भारतीय सिनेमा आणि भारतीय तंत्रज्ञांना सन्मानित केले जात आहे. आणि जेव्हा आम्हाला वाटले की आम्ही भारतात जे काही शक्य आहे ते साध्य केले आहे आणि पुढच्या प्रकल्पाकडे वळलो, तेव्हा पाश्चिमात्यांनी आम्हाला दाखवले की ही फक्त सुरुवात होती.”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.