Mia Khalifa: मिया खलीफा विद्यापीठात देणार शिक्षणाचे धडे? नेमकं काय आहे प्रकरण?

मिया खलीफाला परदेशात एका शिक्षण संचालनाचे शिक्षण सल्लागार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.
Mia Khalifa
Mia KhalifaSaam Tv

मुंबई : पॉर्न स्टार मिया खलिफा(Mia Khalifa) नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. मिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. मियाचे जगभरात लाखो चाहते आहेत. मिया कोणत्या ना कोणत्या करणामुळे नेहमी प्रकाशझोझात असते. आता देखील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टमुळे मिया चर्चेचा विषय ठरली आहे. मियाला परदेशात एका शिक्षण(Education) संचालनाचे शिक्षण सल्लागार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.

Mia Khalifa
Bigg Boss marathi : 'बिग बॉस नको, मालिकाच बरी' ; रुपाली भोसलेला चाहत्यांकडून खास सल्ला

इजिप्तमध्ये मिया खलिफाला शिक्षण सल्लागार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. इजिप्तच्या शिक्षण संचलनाचे फेसबुक पेज हॅक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तसेच या शिक्षण संचालन पेजवरुन मियाच्या फोटो पोस्ट करत तिला शिक्षण सल्लागार बनवण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

Mia Khalifa
RIP Krishnam Raju: बाहुबलीवर दुःखाचा डोंगर; सुपरस्टार प्रभासचे काका कृष्णम राजू यांचे निधन

मीडिया रिपोर्टनुसार, हे सर्व प्रकरण ऑगस्ट महिन्यातील असून इजिप्शियन वृत्तपत्रच्या वृत्तानुसार, बहरीन प्रांताच्या शिक्षण संचालनाचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले होते. या पेजवरुन मियाचा डॉक्टर असा उल्लेख करून तिचा फोटो शेअर करत मियाला शिक्षण सल्लागार बनवावे अशी मागणी शिक्षणमंत्री डॉ. रेड्डी हेगाझी यांच्याकडे करण्यात आली. परंतू नंतर बहरीनच्या शिक्षण विभागाकडून फेसबुक पेज हॅक केल्याची माहिती मिळाली आणि या बातमीची एकच चर्चा रंगली.

विशेष म्हणजे, हॅकर्सनी मिया खलिफाच्या नावासमोर 'डॉक्टर'ही पदवी बहाल करण्यात आहे. माहितीनुसार, मिया खलिफाने टेक्सास विद्यापीठातून इतिहास विषयाची पदवी घेतली आहे. मात्र तिच्या पुढील शिक्षणासंबंधीत काहीही माहिती प्राप्त झालेली नाही. या प्रकरणामुळे मिया पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com