मिका सिंगचा राज कुंद्राला पाठिंबा म्हणाला ते अ‍ॅप...

राजच्या अटकेनंतर बॉलिवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
मिका सिंगचा राज कुंद्राला पाठिंबा म्हणाला ते अ‍ॅप...
मिका सिंगचा राज कुंद्राला पाठिंबा म्हणाला ते अ‍ॅप...Saam Tv

मुंबई - प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राला Raj Thakre मुंबई Mumbai पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज हा पॉर्न फिल्म निर्मिती रॅकेटचा मुख्य सुत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटकेपूर्वी राज कुंद्राची मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून ७ ते ८ तास चौकशी करण्यात आली. राजच्या अटकेनंतर बॉलिवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. काही कलाकारांनी राजवर टीका केली आहे तर काहींनी राजला पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. आता लोकप्रिय गायक मिका सिंगने Mika Singh या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

विरल भयानीने मिका सिंगचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिका सिंग राज कुंद्राला पाठिंबा देताना दिसून येत आहे. मिका सिंग म्हणाला की, काय होतय हे पाहूया. जे काही होणार ते चांगलेच होणार. मला त्या अ‍ॅपविषयी फार काही माहिती नाही. मी ते अ‍ॅप बघितले होते. ते एकदम सिंपल अ‍ॅप होते. त्या अ‍ॅपमध्ये फारकाही नव्हतं. त्यामुळे जे काही होणार ते चांगले होणार अशी अशा करुया. माझ्या माहितीप्रमाणे राज कुंद्रा हा खूप चांगला व्यक्ती आहे. खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला कोर्टच सांगू शकते. काही बॉलिवूड कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे तर काहींनी राजला चांगलेच सुनावले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com