Mission Raniganj Teaser: 'मिशन राणीगंज'चा टीझर रिलीज, 'या' एका सीनवर यूजर्स झाले फिदा...

Akshay Kumar New Movie: 'मिशन राणीगंज'चा टीझर रिलीज, 'या' एका सीनवर यूजर्स झाले फिदा
Mission Raniganj Teaser
Mission Raniganj TeaserSaam Tv

Mission Raniganj Teaser:

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना नवीन भेट दिली आहे. त्याने त्याच्या आगामी 'मिशन राणीगंज' या चित्रपटाचा टीझरशेअर केला आहे. त्याने सोशल मीडियावर 'मिशन राणीगंज'चा टीझर रिलीज केला आहे. 59 सेकंदाचा हा टीझर जबरदस्त वाटत आहे.

चित्रपाटाच्या टीझरमधील एका सिंहावर चाहते खूपच फिदा झाले आहेत. हा सिनपाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स 'अक्षय कुमार इज बॅक' असे ट्वीट करत आहे.

Mission Raniganj Teaser
Buldhana News: दुर्दैवी! दहीहंडीच्या कार्यक्रमात इमारतीची गॅलरी कोसळली, चिमुकलीचा जागीच मृत्यू...

चित्रपटाच्या टीझरची सुरुवात 'राणीगंज कोळसा खाण'ने होते. नोव्हेंबर 1989 मध्ये राणीगंज कोळसा खाणीत सुमारे 220 कामगार अडकल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

स्फोटामुळे भिंत तुटून खाणीत पाणी तुंबू लागले. कामगार मदतीसाठी हाक मारतात, पण त्यांना कोणीही मदत करत नाही. अशा परिस्थितीत खाण अभियंता जसवंत सिंग गिल (अक्षय कुमार) प्रत्येक कामगाराला सुखरूप बाहेर काढण्याची प्रयत्न सुरु करतो. (Entertainment News)

Mission Raniganj Teaser
Konkan Alternatives Route: गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? पुणे, कोल्हापूर आणि कुठून आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या...

टीझरमध्ये एक सिन दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये मागून 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' असा आवाज येतो. त्यानंतर अक्षय कुमारची झलक दिसते. हा एकच सीन चित्रपट हिट होण्यासाठी पुरेसा आहे. यूजर्स या सीनचा फोटो शेअर करत आहेत आणि 'अक्षय कुमार इज बॅक' असे ट्वीट करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com