
Mithilesh Chaturvedi Passes Away मुंबई: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले. मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराने ते त्रस्त होते.
अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, मिथिलेश यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आपल्या मूळ गावी नेण्यात आले होते. त्यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर (Bollywood) शोककळा पसरली आहे. मिथिलेश यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये (Film) काम केले होते. त्यांनी बॉलिवूड अभिनेता सनी देओल याच्या गदर ः एक प्रेम कथा, मनोज वाजपेयी याच्या सत्या आणि शाहरुख खान याच्या अशोका, बंटी और बबली, रेडी या चित्रपटांत महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.
हृतिक रोशन याच्या कोई मिल गया या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे ते चर्चेत आले होते. या चित्रपटात त्यांनी हृतिक रोशनच्या कम्प्युटर टीचरचे पात्र साकारले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना अलीकडेच टल्ली जोडी या वेबसीरीजमध्ये काम मिळालं होतं. या सीरीजमध्ये त्यांच्यासोबत मानिनी डे या देखील मुख्य भूमिकेत होत्या. बॉलिवूड चित्रपटांसह मिथिलेश यांनी रंगभूमीवरही काम केलं होतं. रंगभूमीवरचं त्यांचं योगदान वाखाणण्याजोगं होतं.
सरकारी नोकरी सोडून मुंबईत आले होते मिथिलेश
लखनऊमध्ये राहणारे मिथिलेश चतुर्वेदी यांनी आपल्या करिअरची सुरुवात खूप उशिरा केली होती. मुंबईत येण्यापूर्वी मिथिलेश हे थिएटर आर्टिस्ट होते. त्यांनी बरीच वर्षे सरकारी नोकरी केली. एका मुलाखतीत त्यांनी ही बाब सांगितली होती.
मिथिलेश सुरुवातीला नाटकांमध्ये काम करायचे. नाटकांमध्ये काम करताना त्यांनी भारतभ्रमंती केली. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. थिएटरमध्ये काम करताना ते सरकारी नोकरी देखील करत होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.