मनसे म्हणते...'बीग बी' शो 'बीग हार्ट'.....(पहा व्हिडिओ)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टर्स लावली आहेत. रोड कटिंग मध्ये मुंबई महानगर पालिकेने नोटीस देऊनही प्रतीक्षा बंगल्याची भिंत अजूनही पाडली नाहीये
मनसे म्हणते...'बीग बी' शो 'बीग हार्ट'.....(पहा व्हिडिओ)
- Saam Tv

मुंबई : हो आता एक वेगळाच सिनेमा Movie सुरू होणार आहे .. या सिनेमात ही एक हिरो आहे... आणि त्या हिरोच्या आयुष्यात एक नव संकट आलं आहे .. त्याच्या घरावर कोणी तरी आक्रमण करणार आहे ...आता हा हिरो या सगळ्यातून कसा बाहेर पडतो आहे हे पण पाहिला मिळणार आहे .... सिनेमाचं नाव आहे दिवार sorry दी वाॅर...Mns posters in front of Amitabh Baccchan Residence

होय...महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bacchan म्हणजेच बीग बी यांच्या आयुष्यात सध्या हा सिनेमा घडतो आहे .. पण हा सिनेमा नसून खरया आयुष्यात घडतो आहे... बिगबींचा पहिला बंगला म्हणजेचं जुहूमध्ये असणाऱ्या 'प्रतिक्षा'ची भिंत महानगर पालिकेकडूण तोडण्यात येणार होती.... या बंगलाच्या बाहेरचा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार होती ... मात्र दोन आठवडे होऊनही ही कारवाई काही झाली नाही

त्यामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टर्स लावली आहेत. रोड कटिंग मध्ये मुंबई महानगर पालिकेने नोटीस देऊनही प्रतीक्षा बंगल्याची भिंत अजूनही पाडली नाहीये.. त्यामुळे इतर इमारतींमध्ये ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली तीच कारवाई महानगरपालिकेने महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर का केली नाही असा प्रश्न मनसेने पोस्टरच्या माध्यमातून विचारला आहे. Mns posters in front of Amitabh Baccchan Residence

हे पाहाताच राज ठाकरेंच्या Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MNS महानगर पालिकेवर निशाणा साधला आहे .... दोन आठवडे होऊन ही या घराच्या भिंतीवर का कारवाई केली नाही हा प्रश्न विचारला आहे .... आणि या साठी त्यांनी बिंगबीच्या घराबाहेर अनेक पोस्टर सुद्धा लावले आहेत......

मनसे म्हणते...'बीग बी' शो 'बीग हार्ट'.....(पहा व्हिडिओ)
इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा धक्का; भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

हीचं गोष्ट बाकी सर्वसामन्यसोबत घडली असती तर आता पर्यंत कारवाई केली गेली असती ...मग अजुनही महानगर पालिकेनी बच्चन साहेबांच्या बंगल्याच्या भींतीवर कारवाई का नाही केली हा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. Mns posters in front of Amitabh Baccchan Residence

शहेनशहांनी त्यांच्या अनेक सिनेमात शेवटी संकट दूर करून विजय मिळवला आहे ... पण आता हा महानायक आपल्या खऱ्याआयुष्यातल्या सिनेमाचा मनसेने उभा केलेला climax कसा पार करतो हे पाहावचं लागेल

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com