Jacqueline Fernandez: मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलिनच्या अडचणीत वाढ; आज होणार तिच्या जवळच्या व्यक्तीची चौकशी !

मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस दररोज नव्या पेचात सापडत आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलिनची दोन दिवसांमध्ये १५ तास चौकशी केली होती.
Jacqueline Fernandez News
Jacqueline Fernandez NewsSaam Tv

मुंबई: मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) दररोज नव्या पेचात सापडत आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने (Enforcement Directorate) मनी लॉंड्रिंग प्रकरणात (Money Laundering) जॅकलिनची दोन दिवसांमध्ये १५ तास चौकशी सुरु होती. आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित असलेल्या या खंडणी प्रकरणाची चौकशी तपास यंत्रणा करीत असून सुकेशची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींची फसवणूक केल्याचा आरोपही सुकेशवर आहे.

Jacqueline Fernandez News
Viral Video: रस्त्यांवरुन शशांक भडकला; व्हिडिओ सोशल मीडियावर केला शेअर

१७ ऑगस्ट रोजी इडीने आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये जॅकलिनचे सुकेशसोबत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, फर्नांडिससोबत आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला त्यांच्याकडून आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. तपास यंत्रणेने केलेल्या चौकशीदरम्यान, जॅकलीन फर्नांडिसने भेट म्हणून भरपूर महागाड्या वस्तू घेतल्याचे कबूल केले आहे.

Jacqueline Fernandez News
Jacqueline Fernandez : जॅकलिनसोबतच 'या' फॅशन डिझायनरची होणार चौकशी

या प्रकरणात मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर अनेक हाय-प्रोफाईल लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. इडीने 17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुकेश चंद्रशेखरच्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसला आरोपी म्हणून नाव दिले. ईडीच्या म्हणण्यानुसार फर्नांडिस आणि नोरा फतेही यांनी चंद्रशेखरकडून महागड्या गाड्या आणि इतर अनेक भेटवस्तू घेतल्या होत्या. सोबतच मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसची डिझायनर लेपाक्षीची आज तपास यंत्रणा चौकशी करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com