
TMKOC Producer In Trouble Again: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित कुमार मोदी आता कमालीचे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सर्वात आधी मिसेस रोशन सोढी उर्फ जेनिफर मेस्त्री बंसीवालने मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने त्यांच्यावर आरोप लावले आहेत. मोनिका भदोरियाने मालिकेत बावरी अर्थात बागाच्या गर्लफ्रेंडचे तिने पात्र साकारले आहे.
नुकतेच तिने एका मुलाखतीत सेटवरील वातावरणाबद्दल भाष्य केले आहे. मालिकेच्या सेटवर कामाचे वातावरण नरकासारखे असते. इतकंच नाही तर तिथे कलाकारांना कुत्र्यांसारखी वागणूक दिली जाते, असंही तिने वक्तव्य केलंय.
मोनिका भदोरिया ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये बावरीची भूमिका साकारली होती. मालिकेत बावरी म्हणजे बागाची गर्लफ्रेंड. पण तिने २०१९ मध्येच शोला सोडचिठ्ठी दिली आहे. मोनिका भदोरियाने एका नवीन मुलाखतीत सांगितले की, निर्मात्यांनी तीन महिन्यांचे पैसे दिलेले नाहीत. तिच्याकडे निर्मात्यांचे जवळपास ४ ते ५ लाख रुपये अद्यापही बाकी आहेत.
मोनिका भदोरियाने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, “माझं थकवलेल्या पेमेंटवरून निर्मात्यांशी गेल्या वर्षभरापासून मी भांडण सुरू आहे. प्रत्येक कलाकाराचे पैसे निर्मात्यांनी थकवून ठेवले आहेत. त्या जागी राज अनडकट असो किंवा गुरूचरण सिंग सोड्ढी अनेकांचे निर्मात्यांनी पेमेंट थकवले आहेत. केवळ कलाकारांवर अत्याचार करण्यासाठी निर्माता पैसे थकवून ठेवतात. त्यांच्याकडे पैशाची काहीच कमतरता नाही, तरी देखील अनेकांचे पैसे थकवून ठेवले.”
मोनिका भदोरियाने पुढे मुलाखतीत सांगितले, मालिकेच्या सेटवर सर्व वातावरण ‘नरका’सारखं असतं. मोनिकाची आई कॅन्सरवर उपचार घेत होती, पण निर्मात्यांनी तिला अजिबात साथ दिली नाही. ती म्हणाली, “मी हॉस्पिटलमध्ये रात्र काढायचे आणि ते मला शूटसाठी पहाटे फोन करायचे. मी येण्याच्या मन:स्थितीत नाही, असे सांगूनही ते मला शूटिंगला यायला भाग पाडायचे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शूटिंगला आल्यानंतर मला अनेक वेळ थांबायला लागायचं. माझ्याकडे अजिबात कोणतंच काम नसायचं.”
मोनिका भदोरिया पुढे सांगते, “मला धक्का बसला होता, पण माझ्या आईच्या मृत्यूनंतर फक्त सात दिवसांनी मला निर्मात्यांनी फोन केला आणि सेटवर शूटिंगसाठी पुन्हा बोलवून घेतलं. माझी तब्येत ठीक नसल्याचं मी सांगितल्यावर त्याची टीम म्हणाली, ‘आम्ही तुम्हाला पैसे देत आहोत, आम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही उभे राहावे. तुमची आई अॅडमिट असो वा दुसरं कोणी.’ माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी सेटवर गेले. आणि मी फक्त रडायचे. सोबतच अनेकदा त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन करून अत्याचार देखील केले आहेत. नेहमीच मालिकेच्या सेटवर खूप गुंडगिरी चालायची.”
असित मोदी एकदा म्हणाले होते की, मी देव आहे. यावर मोनिका निर्मात्यांना म्हणते. “मला अशा ठिकाणी काम करायचे नाही, जिथे काम केल्यावर तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटते. जो कोणी येतं, तो मनाला वागेल तसं वागतो.” सोबतच सोहेल देखील मालिकेच्या सेटवर उद्धटपणे बोलतो.
मोनिका भदोरिया पुढे म्हणते, “ ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ चे सध्याचे कलाकार अर्थात जे शोमध्ये आहेत ते बोलणार नाहीत. असित मोदीने त्याच्या विरोधात मीडियामध्ये काहीही चुकीचे बोलणार नाही, असा करारही तिच्याकडून करून घेतला होता. इतरांनी शो सोडला तेव्हा जेनिफर मिस्त्रीही बोलली नाही. जेव्हा तिच्याशी काही घडले तेव्हा ती बोलली. प्रत्येकाला आपली नोकरी वाचवायची आहे. त्याने जेवढे अत्याचार केले तेवढे कोणी केले नाही.”
मोनिका भदोरियाच्या म्हणण्यानुसार, “ ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ साइन केला, तेव्हा तिला दरमहा 30,000 रुपये इतकं मानधन मिळत होतं. ६ महिन्यांनी पगार वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी कधीही पैसे वाढवले नाही. असित मोदी मालिकेतील कलाकारांना पैश्यांच्या बाबतीत फसवतात. खरोखर ते कुत्र्यासारखे सेटवर वागणूक देतात. निर्मात्यांनी माझ्याशी खूप वाईट वर्तन केले आहे. मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहल रमानी हा अतिशय गरीब माणूस आहे. पण असित मोदी फारच उद्धट माणूस आहे. त्याने नट्टू काकांना अनेकदा मालिकेच्या सेटवर शिवीगाळही केली होती.”
मोनिका भदोरिया व्यतिरिक्त मालिकेचे पुर्वीचे दिग्दर्शक मालव रझदा यांनीही जेनिफर मिस्त्री बन्सीवालला पाठिंबा दिला आहे. जेनिफर मिस्त्रीने अलीकडेच प्रोजेक्ट हेड सोहल रमानी आणि एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. असित मोदी यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. जेनिफरने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र, असित मोदींनी हे आरोप फेटाळून लावले आणि उलट जेनिफरवर सेटवर उशिरा येण्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.