Ponniyin Selvan 2 Trailer: बहुप्रतीक्षित चित्रपट 'पोनियिन सेल्वन 2' ट्रेलर प्रदर्शित; काही तासातच पार केले 6 मिलियन व्ह्यूज

PS2 Trailer Out: चोळ साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची गाथा आता दुसऱ्या भागात म्हणजेच 'पोनियिन सेल्वन भाग २' मध्ये दाखविण्यात अली आहे.
Ponniyin Selvan 2 Trailer Out
Ponniyin Selvan 2 Trailer OutSaam Tv

'Ponniyin Selvan 2' Trailer Released: बहुप्रतीक्षित चित्रपट 'पोनियिन सेल्वन 2'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ऐश्वर्या राय, कार्ती आणि चियान विक्रम स्टारर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. 'पोनियिन सेल्वन 2' प्रदर्शनासाठी सज्ज आहे, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

चोळ साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची गाथा आता दुसऱ्या भागात म्हणजेच 'पोनियिन सेल्वन भाग २' मध्ये दाखविण्यात अली आहे. ट्रेलर खरंच खूप दमदार आहे आहे. प्रत्येक सीन तयार करण्यासाठी आणि पडद्यावर जिवंत करण्यासाठी घेतलेली मेहनत ट्रेलर पाहून तुमच्या लक्षात येईल.

Ponniyin Selvan 2 Trailer Out
Viral Video: 'बहरला हा मधुमास' गाण्याची भुरळ सातासमुद्रापलीकडे; विदेशी क्रिकेटरचा व्हिडिओ व्हायरल

ट्रेलरची सुरुवात सिंहासनाच्या नवीन वारसाच्या घोषणेने होते. अरुणमोडीना समुद्राने नेले होते आणि आता मधुरकातन देव हे सिंहासनाचे पुढील वारस असतील असे म्हटले जाते. यानंतर सिंहासन आणि जमीनचे दोन हिस्से करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडते. विक्रम म्हणजेच आदित्य करिकलन बदला घेण्यासाठी निघतो.

पोन्नियिन सेल्वन 2 च्या ट्रेलरमध्ये राजकुमारी नंदिनी म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन तलवार चालवताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा तेज आणि भाव थक्क करणारे आहेत. नंदिनीने चोळ साम्राज्याचा अंत करण्याचे प्रतिज्ञा घेतली होती आणि दुसऱ्या भागात तिची ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा लढताना दिसत आहे. यावेळी सिंहासनासाठी चोळ राज्यात तांडव होणार हे ट्रेलर पाहून स्पष्ट होत आहे. एका दिवसात या चित्रपटाचा ट्रेलरने ६ मिलियन लोकांनी पाहिला आहे.

'पोनियिन सेल्वन 2' चा ट्रेलर पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. मणिरत्नम दिग्दर्शित, या चित्रपटात ऐश्वर्या, कार्ती आणि विक्रम यांच्यासह शोभिता धुलिपाला, जयम रवी, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी आणि प्रकाश राज मुख्य भूमिका साकारत आहेत, ज्यांना आपण पहिल्या भागात देखील पहिले आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांव्यतिरिक्त तो हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com