
Ananta- Radhika Engagement: उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचा साखरपुडा गुरुवारी मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. त्यांच्या साखरपुड्यात नवरा- नवरीची अंगठी एका खास व्यक्तीने दिली.
कदाचित आतापर्यंत आपण अनेकदा ही अशी अंगठी देताना दिसले नाही. ही अंगठी त्यांच्या कुत्र्याने दिली. यावेळी लग्नात अनेक विविध कार्यक्रम पार पडले. पण एका डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले होते. नीता अंबानींच्या डान्सने त्या कार्यक्रमाला सर्वाधिक रंगत आणली.
अनंतच्या लग्नाला त्याचे काका अनिल अंबानी आणि काकू टीना अंबानीही पोहोचले होते. यावेळी दोघांनीही पारंपारिक लूक परिधान केला होता. यावेळी अनेक स्पोर्ट्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. यामध्ये सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय, श्रेया घोषाल यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश होता.
बुधवारी अनंत- राधिकाचा मेहेंदीचा कार्यक्रम देखील आटोपला. गेल्या वर्षी २९ डिसेंबरला राजस्थानच्या नाथद्वारायेथील श्रीनाथजी मंदिरात रोका हा कार्यक्रम पार पडला.'गोल धान' हा गुजराती कुटुंबांमध्ये लग्नात विशेष विधीसोहळा पार पडतो. 'गोल धान' म्हणजे गूळ आणि धणे. गुजराती कुटुंबांमध्ये हा विवाहपूर्व विधी आहे ज्यात मुलाच्या घरी गूळ आणि धणे वाटले जातात. वधूचे कुटुंबीय नवरदेवाच्या घरी मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. यानंतर दोघेही एकमेकांना अंगठी घालतात आणि घरातील वरिष्ठांचे आशिर्वाद घेतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.