
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अबांनी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Neeta Ambani) या सध्या चर्चेत आल्या आहेत. नीता अंबानी या चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ. नीता अंबानींचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
अंबानी कुटुंब आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे बॉन्ड खूपच घट्ट आहे. अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मग ते लग्न असो वा पार्टी याला बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असते. अशामध्येच आता नीता अंबानी यांचा डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
अंबानी अपडेट या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नीता अंबानी आणि त्यांच्यासोबत काही फ्रेंड्स या डान्स करताना दिसत आहेत. हे सर्वजण दीपिका पादुकोणच्या 'नगाड़े संग ढोल बाजे' या सुपरहिट गाण्यावर डान्स करत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की ही एका डान्सची प्रॅक्टिस सुरु आहे.
दरम्यान, नीता अंबानी अनेकदा त्यांच्या जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. नीता अंबानी यांच्या चाहत्यांना त्यांच्या महागड्या गोष्टी जाणून घेण्याची खूपच उत्सुकता असते. त्याचबरोबर नीता अंबानी कधी कधी त्यांच्या महागड्या घड्याळामुळे किंवा महागड्या ड्रेसमुळे चर्चेत असतात. नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे मार्च २०२३ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी मुकेश अंबानी यांच्या परिवाराशिवाय देशातील आणि जगातील अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.