मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेल्या ‘वाय’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

प्रेक्षकांना ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
Y Movie Trailer, Latest Marathi Movie, Mukta Barve Movie
Y Movie Trailer, Latest Marathi Movie, Mukta Barve MovieSaam Tv

मुंबई - अभिनेत्री मुक्ता बर्वेची (Mukta Barve) मुख्य भूमिका असलेल्या वाय या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदराशीत झाला आहे. येत्या २४ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वाय या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. प्रेक्षकांना ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. मुक्ता बर्वेने देखील या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ती’चा लढा 'ती'च्या अस्तित्वासाठी कारण, भीतीपेक्षा मोठे कर्तव्य आहे असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. (Latest Marathi Movie)

या चित्रपटात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी का घडत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे.

Y Movie Trailer, Latest Marathi Movie, Mukta Barve Movie
'भारत सरकारने मुस्लिम धर्मियांची माफी मागावी अन्यथा...'; ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक

यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ हा चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे. मुक्तासोबत या चित्रपटात प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण,नंदू माधव, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा कलाकारांसोबत आदी कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांना या चित्रपटाची जास्तच उत्सुकता लागली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com