Multiplex In Kashmir: तीन दशकानंतर काश्मिरमध्ये खुलणार पुन्हा चित्रपटगृह

१९९६ मध्ये चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण त्याला यश आले नाही. अखेर आजपासून श्रीनगरमध्ये मल्टिप्लेक्स सुरु झाले आहेत.
Multiplex
Multiplex Saam Tv

मुंबई: काश्मिरचे (Kashmir) आणि चित्रपटसृष्टीचे (Film Industry) नाते काही नवीन नाहीये. काश्मिरमध्ये अनेक चित्रपटांची शूटिंगही झाल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक मोठ्या आवडीने चित्रपट पाहतात. तसेच वाढत्या आतंकवादामुळे बरेच नागरिक चित्रपट पाहण्यासाठी नकार देऊ लागले. आता राज्यातील चित्रपट संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी स्थानिक व्यापार आणि व्यावसायिक पावले उचलत आहेत. 1996 मध्ये चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण त्याला यश आले नाही. मात्र आजपासून श्रीनगरमध्ये मल्टिप्लेक्स (Multiplex) सुरु होताच 'लाल सिंह चड्ढा' (Lal Singh Chaddha) चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

Multiplex
UN मध्ये संबोधित करताना प्रियांका म्हणाली; सर्व काही ठीक नाही... VIDEO व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) स्टार 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसह मल्टिप्लेक्स काश्मिरमध्ये आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहेत. ३० सप्टेंबरपासून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या विक्रम वेधाच्या (Vikram Vedha) स्क्रीनिंगसह चित्रपटांचे नियमित शो सुरू होणार आहेत. काश्मीरच्या पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये एकूण ५२० आसन क्षमतेची तीन चित्रपटगृहे आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने थिएटरच्या आवारात 'फूड कोर्ट' देखील असणार आहे.

Multiplex
बॉलिवूडसोबत टॉलिवूडला देखील वाटतेय 'ही' भीती, घेतले काही महत्वपूर्ण निर्णय...

श्रीनगरमध्ये सुरू होणारे मल्टिप्लेक्स हे बदामी बाग मिलिटरी मुख्यालयाजवळ बांधले आहे. जिथे १९६५ मध्ये ब्रॉडवे सिनेमा असायचा. ब्रॉडवे सिनेमा हा आता इतिहास जमा झाला आहे आणि त्या इतिहासाच्या पुढे बदलत्या काश्मीरची घोषणा करणारे हे मल्टिप्लेक्स उभारले आहे. या मल्टिप्लेक्सचे काम पूर्ण व्हायला २ वर्षे लागली. या मल्टीप्लेक्ससोबतच अनंतनाग, श्रीनगर, बांदीपोरा, गंदरबल, डोडा, राजौरी, पुंछ, किश्तवाड आणि रियासी येथे देखील लवकरच सिनेमा हॉलचे उद्घाटन होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com