मुंबई पोलिसही Money Heist चे फॅन, Bella Ciao गाण्यावर वाजवला बँड

मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ते Money Heist चे टायटल सॉंग बेला चाओ या गाण्यावर चक्क बँड वाजवत आहेत.
मुंबई पोलिसही Money Heist चे फॅन, Bella Ciao गाण्यावर वाजवला बँड
मुंबई पोलिसही Money Heist चे फॅन, Bella Ciao गाण्यावर वाजवला बँडSaam Tv News

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय स्पॅनिश वेबसिरीज मनी हाईस्टचा पाचवा सीजन शुक्रवारी रिलीज झाला. जगभरात या वेब सीरीजचा चाहता वर्ग मोठा आहे. मुंबई पोलिसही या वेब सीरीजचे फॅन आहेत. मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ते मनी हाईस्टचे टायटल सॉंग बेला चाओ या गाण्यावर चक्क बँड वाजवत आहेत. त्यामुळे मनी हाईस्टची क्रेज किती आहे हे लक्षात येत.

मुंबई पोलिसांचे बँड पथक हे खाकी स्टु़डीओ म्हणून ओळखले जाते. याच पथकाने हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, ‘नेहमी काहीतरी नवीन करण्याचा ट्रेंड करण्याचा प्रयत्न करा. सुरक्षेचा सीझन कधीही संपू देऊ नका. ‘बेला चाओ’सह खाकी स्टुडिओ पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. असं ट्विट करत त्यांनी व्हिडिओ शेयर केला आहे. मुंबई पोलिसांच्या या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी त्याचं कौतुकही केलं आहे.

मुंबई पोलिसही Money Heist चे फॅन, Bella Ciao गाण्यावर वाजवला बँड
सिद्धार्थच्या मृत्यूने फॅनला आली चक्कर; तरुणी रुग्णालयात भरती

मनी हाईस्टच्या चौथ्या सीजनमध्ये एकीकडे प्रोफेसरची टीम बॅंक ऑफ स्पेनमध्ये फसली आहे तर दुसरीकडे इन्फेक्टर अॅलिसियाने प्रोफेसरचा पत्ता शोधून काढून त्याच्यावर बंदुक रोखली आहे. आता अशा स्थितीत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर होता. अखेर काल पाचवा सीजन झाला आहे. या पाचव्या सीजनचा दुसरा भाग व्हॉल्यूम २ हा येत्या ३ डिसेंबरला रीलीज होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com