
सचिन गाड
Mumbai News: सलमान खानला पुन्हा एकदा ईमेलद्वारे धमकी पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. या धमकीनंतर एकच सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. (Latest Marathi News)
मुंबई पोलिसांनी याआधी सलमान खानच्या कार्यलायात धमकीचा ईमेल पाठविल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि मोहित गर्ग या गुंडाच्या विरोधात गुन्हा नोंद केला. अभिनेता सलमानचे मॅनेजर आणि जवळचे मित्र प्रशांत गुंजाळकर यांनी ही तक्रार केली.
सलमान खानला (Salman Khan) हा मेल लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीनंतर आल्याची माहिती समोर आली आहे. या ईमेलमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर लॉरेन्सने एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत उघड अभिनेत्याला मारण्याचे ध्येय असल्याचे सांगितले होते.
मेलमध्ये काय म्हटलं आहे?
पोलिसांच्या (Police) एफआयआरनुसार, एका अभिनेत्याच्या कार्यालयात धमकीचा मेल हा शनिवारी दुपारी पाठविण्यात आला होता. गुंड मोहित गर्गच्या ईमेल आयडीवरून हा मेल पाठविण्यात आला होता.
'गोल्जी भाईला बोलायचा होतं. तुझा बॉस सलमानसोबत. त्याने मुलाखत पाहिली असेलच. त्याने मुलाखत बघितली नसेल तर बघायला सांगा. मॅटर क्लोज करायचा असेल तर बोलणे करून द्या. समोरासमोर करायचे असेल तर सांगत. मी आता माहिती दिली आहे. पुढच्या वेळी थेट झटकाच पाहायला मिळेल', असा मजकूर सलमान खानच्या कार्यालयात पाठविण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.